Praful Patel Controversy : मंत्री पियुष गोयलांचा मोठा खुलासा, प्रफुल पटेल अध्यक्ष झाल्याची माहिती कोणी दिली ते सांगितलं

Piyush Goyal BJP NCP President: पियुष गोयल यांनी अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याचे वक्तव्य केल्यानंतर पटेल यांनी लगेच खुलासा केला. आता गोयला यांनी त्यांना नेमकी कोणाकडून माहिती मिळाली ते सांगितले आहे.
Praful Patel Piyush Goyal
Praful Patel Piyush GoyalSarkarnama
Published on
Updated on

NCP President : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याचे पीटीआयशी बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर स्वतः पटेल यांनी ट्विट करत खुलासा केला की त्यांची अध्यक्षपदी निवड झालेली नाही.

पटेल यांच्या ट्विटनंतर पियुष गोयल यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, एक वरिष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली होती की प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले आहेत. या माहितीची सत्यतेची पडताळणी न करता याबाबत मी मीडियासोबत बोललो.

मात्र आता मला माहिती झाले आहे की मला मिळालेली माहिती चुकीची होती. राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वात काम करत आहे. चुकीच्या माहिती बद्दल मी खेद व्यक्त करतो, असे देखील त्यांनी सांगितले.

Praful Patel Piyush Goyal
Ajit Pawar Death : ‘अजितदादांनी मुलाच्या लग्नाला सुनेत्रावहिनींसह जोडीने येण्याचा शब्द दिला होता; पण नियतीने घात केला’

प्रफुल पटेलांचा खुलासा

पियुष गोयल यांनी अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याचे वक्तव्य केल्यानंतर पटेल यांनी लगेच खुलासा केला की, मीडियाच्या माध्यमातून माझी अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती दिली जात आहे. मात्र, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आमदार यांना विश्वासात घेत त्यांच्या सूचनेचे पालन करत ही अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया राबवू.

Praful Patel Piyush Goyal
NCP President : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, "सर्वांच्या भावना आणि इच्छांचा..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com