Video PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार, महायुती निवडणुकीचे रणशिंग फुंकणार!

PM Narendra Modi Mumbai Tour Assembly Election Preparation : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली-ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन होणार आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News : लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात मुंबई महापालिकेच्या विकास कामांचे उद्घाटन करतील. या विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकतील.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नरेंद्र मोदी मुंबईत येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली-ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी 16 ठिकाणी सभा घेतली मात्र त्यातील 12 ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे आत्तापासूनच विधानसभेची तयारी भाजपने सुरू केली आहे.

PM Narendra Modi
Shiv Sena: महायुतीचं टेन्शन वाढलं; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचे विधानसभेवरून वक्तव्य

नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली नाही. एनडीएची सत्ता पुन्हा आल्याचे विरोधक म्हणत आहेत. त्यामुळे भाजपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आगामी हरियाणा, महाराष्ट्रा, झारखंड विधानसभा निवडणुकीत यश मिळणे महत्त्वाचे आहे. विशेषता महाराष्ट्रात मोठा फटका बसल्याने येथे पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांनी कंबर कसली आहे.

मोदींनी वारंवार महाराष्ट्रात यावे...

शरद पवार Sharad Pawar यांनी कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होती की, पंतप्रधानांनी जेथे जेथे सभा घेतल्या तेथे महाविकास आघाडीचे उमेदवार विजची झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकसाठी त्यांनी वारंवार महाराष्ट्रात यावे.

PM Narendra Modi
Rahul Gandhi : लोकसभेतील भाषण राहुल गांधींना भोवणार? केंद्रीय मंत्र्यांकडून कारवाईचे संकेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com