Police Threats Students : आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांची धमकी? तुमच्या खिशात ५० ग्रॅम ड्रग्स टाकून अन्...; काँग्रेसने 'तो' व्हिडिओ दाखवला

Students Protest Police Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, किती नीचपणा सुरू आहे, पाहा!
Congress releases a video alleging police intimidation of students during a protest, intensifying the political debate.
Congress releases a video alleging police intimidation of students during a protest, intensifying the political debate.sarkarnama
Published on
Updated on

Students Protest News : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत तुमच्या खिशात ५० ग्रॅम पावडर( ड्रग्स) टाकून आत टाकू, अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ काँग्रेसने आपल्या अकाऊंटवर शेअर करत सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, किती नीचपणा सुरू आहे, पाहा! आंदोलनात सहभागी झालात तर "तुमच्या खिशात ५० ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू," अशा धमक्या पोलिसांकडून दिल्या जात असल्याचे आरोप होत आहेत.

'विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाणारी ही दडपशाही लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.',असे देखील त्यांनी म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?

काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना गाडीमध्ये बसवले आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये धमकावले जात आहे. पोलिस कर्मचारी म्हणतो आहे की, फिर मेरे जैसा कोई बेकार आदमी नही, वापीस इधर किधर मिला तो 50-50 ग्रॅम पावडर डाल देगा जेब मैं, फिर गया तू, तो जामीन!

ठाकरे बंधू मैदानात

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आज एकत्र पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यासांठी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. रविवारी हा मोर्चा शिवाजी पार्क येथून काढण्यात येणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर मोर्चात घुसखोरी करून मोर्चाला वेगळेवळण लावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना धडा शिकवू, असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com