

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray - winter session
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीनंतर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात पुन्हा एकदा तडजोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी आग्रही आहे, तर १२ आमदारांचे निलंबन मागे घेतले जावे यासाठी भाजप आग्राही आहे. याच दोन मुद्द्यांवर दोन्ही बाजूंचे एकमत होवून तडजोडीचे राजकारण होण्याची शक्यता वर्तवला जात आहे.
महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) मागच्या १० महिन्यांपासून अध्यक्षपदाची निवडणूक घेतलेली नाही. तसेच आता (winter session) निवडणूक घेतल्यास आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड होणार आहे. महाविकास आघाडीकडे १७० आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे अध्यक्षांची निवड करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. मात्र यानंतर देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अध्यक्षपदासाठी आमचा उमेदवार राहील, असे सांगून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.
त्यामुळे भाजपने (BJP) उमेदवार देऊ नये आणि निवडणूक बिनविरोध करावी अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. दुसऱ्या बाजूला १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी भाजपला सभागृहातच दाद मागण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार भाजपच्या १२ आमदारांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना आमच्या निलंबनाचा कालावधी कमी करा आणि याच अधिवेशनात कामकाजात सहभागी होऊ द्या, असे पत्र दिले आहे.
आता याच मुद्द्यावर एकमत होवून तडजोडीचे राजकारण होण्याची शक्यता वर्तवला जात आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपने सहकार्य केले तर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन याच अधिवेशनात मागे घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच याबाबतच्या प्रस्तावावर दोन्ही बाजूंच्या नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली असल्याचीही माहिती मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.