भांडूप दुर्घटनेने विधानसभा हळहळली; फडणवीसांच्या मागणीनंतर एक अधिकारी निलंबित

Bhandup newborn baby death : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका अधिकाऱ्याचे निलंबन करत असल्याची घोषणा केली.
Devendra Fadanvis on Bhandup newborn baby death

Devendra Fadanvis on Bhandup newborn baby death

Sarkarnama 

Published on
Updated on

मुंबई : भांडुपमधील सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील ४ नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनेचे आज विधीमंडळात तीव्र पडसाद उमटले. या दुर्देवी घटनेने संपुर्ण सभागृह हळहळले. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी आक्रमक होत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. विरोधकांच्या या आक्रमक मागणीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका अधिकाऱ्याचे निलंबन करत असल्याची घोषणा केली.

भांडूपमधील पालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतीगृहातील वातानुकुलित यंत्रणेमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे नवजात अर्भक अतिदक्षता विभागातील ४ दुर्दैवी बालकांचा सेफ्टीक शॉकने मृत्यू झाला आहे. (Bhandup newborn baby death) या घटनेप्रकरणी विरोधकांनी आज सभागृहात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या बालकांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadanvis on&nbsp;Bhandup newborn baby death</p></div>
मनसे नेता म्हणाला हात दुखतोय अन् राज ठाकरेंनी थेट मलमच लावून दिले...

फडणवीस पुढे म्हणाले, अशा घटना रोज घडत असतील आणि यावर चर्चा होत नसतील तर कसे चालेल? त्यामुळे माझी विनंती आहे की, हे सर्व कामकाज थांबवा आणि या मुद्द्यावर चर्चा करा. माझे तर मत आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा मंत्री महोदयांनी केली पाहिजे. लहान बालकांचा मृत्यू झाला आहे, हे गंभीर आहे. संवदेशनशीलता बोथट करुन चालणार नाही. केवळ विरोधी पक्षाने काहीतरी मांडलं आहे म्हणून त्यांना खाली बसवायचे, चालू द्यायचे नाही असे चालणार असले तर ते चुकीचे आहे. असेही ते म्हणाले.

यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यावर उत्तर देताना म्हणाले, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे हे कोणाला नाकारता येणार नाही. पण यात दोषी कोण आहे याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. दोषीला शिक्षा झालीच पाहिजे, निर्दोषला शिक्षा होता कामा नाही. यामुळे याची चौकशी होऊन दोषीवर कारवाई होईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadanvis on&nbsp;Bhandup newborn baby death</p></div>
राणेंचा देवेंद्र फडणवीसांना धक्का : 'ती' डिनर डिप्लोमसी वाया जाणार

एकनाथ शिंदे यांच्या या उत्तरावर फडणवीस म्हणाले, हे वेळ मारुन नेण्याचे काम आहे. तीन दिवस झाले, आम्ही बोलल्यावर माहिती घेणार का? आमची मागणी आहे तात्काळ या संदर्भात कारवाई करा. मुलुंडला झाली, नायरला झाली अशा घटना रोज होत असतील आणि आम्ही चौकशी करू म्हणत असतील तर? संबंधित अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करायला हवे. यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संबधित आरोग्य विभागाचे MOH अधिकारी यांचे निलंबन करत असल्याची घोषणा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com