Sunil Tatkare: सुनील तटकरे सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला! राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याच्या चर्चेमुळं भेटीला महत्व; नेमकं काय घडलं?

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तसंच अजित पवारांच्या निधनानंतर तटकरे हे पहिल्यांदाच एकट्यानं शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत.
Sharad Pawar and Sunil Tatkare
Sharad Pawar and Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सध्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तसंच अजित पवारांच्या निधनानंतर तटकरे हे पहिल्यांदाच एकट्यानं शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वगळल्याची चर्चा दिवसभर सुरु होती. त्यातच तटकरेंनी अचानक शरद पवारांची भेट घेतल्यानं या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Sharad Pawar and Sunil Tatkare
Viral Indira Gandhi Post: "देशहितासाठी सोनं खरेदी करु नका", इंदिरा गांधींचं आवाहन; सोशल मीडियावरच्या दाव्यावर काँग्रेसचं स्पष्टीकरण

सुनील तटकरे हे शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्या निवासस्थानावरुन बाहेरही पडले आहेत. बाहेर पडताना तटकरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं की, मी शरद पवारांच्या भेटीसाठी केवळ त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. याव्यतिरिक्त आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. गेल्या अनेक काही दिवसांपासून शरद पवारांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळं त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी मी वेळ मागितला होतो.

Sharad Pawar and Sunil Tatkare
Farmer News : PM मोदींचं आवाहन म्हणजे शेतकऱ्यांसाठी 'दुष्काळात तेरावा महिना' : गंभीर परिणाम होण्याची भीती

"गेले काही दिवस पवार साहेब हे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. मी आज गुवाहाटीला आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला गेलो होतो. उद्या मी पुन्हा दौऱ्यावर आहे पण आजच शरद पवारांना भेटीसाठी वेळ होता. त्यानंतर त्यांनाही वेळ मिळणार नाहीए. त्यामुळं मी आजच मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी इथं आलो आहे, याशिवाय दुसरा कुठलाही विषय नाही. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आणि सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही काम करतो आहोत ते ठामपणे सुरुच राहणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीचा विषयाचा या भेटीशी बिल्कुल संबंध नाही. यासंदर्भात सुनेत्रा पवारांनी स्वतः ट्विट केलेलं आहे, त्यामुळं आजची भेट ही केवळ शरद पवाराच्या तब्येची विचारपूस करण्यासाठीच होती" असं सविस्तर स्पष्टीकरण यावेळी सुनील तटकरे यांनी दिलं आहे.

Sharad Pawar and Sunil Tatkare
Video: भाजप नेत्याची पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी; शक्ती प्रदर्शनासाठी काढली कार रॅली; ट्रॅफिक जामनं नागरिक वैतागले

राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याची चर्चा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सरचिटणीस तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावापुढील पदं वगळून राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीनिशी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक यादी निवडणूक आयोगाला दिल्याचं आज समोर आलं होतं. त्यामुळं केंद्रीय कार्यकारिणीतून पटेल आणि तटकरे यांना वगळण्यात आल्याची जोरदार चर्चा दिवसभर सुरु होती. या चर्चा सुरु झाल्यानंतर स्वतः सुनेत्रा पवार यांनी ट्विट करुन याबाबतही स्पष्टीकरण दिलं होतं. यात त्यांनी म्हटलं होतं की, माध्यमांमध्ये सध्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची जी यादी व्हायरल झाली आहे त्यात केवळ लेखनिकाची चूक होती ती लवकरच दुरुस्त करण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com