NCP Internal Politics: दिल्लीतून मोठी बातमी; प्रफुल पटेल नाराज? राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? समोर आले मोठे कारण!

Union Cabinet Expansion News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय? याची चर्चा रंगली आहे. पटेल यांच्या नाराजी मागचे मोठे कारण समोर आले आहे.
Sunetra Pawar, praful patel
Sunetra Pawar, praful patel sarkarnnama
Published on
Updated on

New Dehli News : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे समजते. त्यामुळे दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तारात संधी मिळावी म्हणून खासदार मंडळी लॉबिंग करीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे येणार असल्याने जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे दिल्लीतून मोठी बातमी येत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल पटेल नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय? याची चर्चा रंगली आहे. पटेल यांच्या नाराजी मागचे मोठे कारण समोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) गेल्या अनेक दिवसापासून अंतर्गत नाराजी असल्याचे पुढे आले आहे. या नेतेमंडळींच्या दोन गटामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल हे केंद्रात मंत्रिपद आणि पक्षातील कार्याध्यक्षपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रफुल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद तसेच पक्षातील कार्याध्यक्षपद देण्यास पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी विरोध आहे. त्यामुळे पक्षात अंतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा असून त्याचा फटका प्रफुल पटेल यांना बसला आहे.

Sunetra Pawar, praful patel
Maharashtra News Update: दिवसभरात देश-विदेशात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

अजितदादांच्या निधनानंतर प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या स्तरावर चर्चा न करता थेट निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केल्यामुळे पक्षातील काही आमदार आणि वरिष्ठ नेते त्यांच्यावर नाराज आहेत. या सर्व घडामोडींमुळे पक्षाच्या नेतृत्वावर अनावश्यक दबाव निर्माण होत असल्याची भावना काही आमदारांनी व्यक्त केली. पक्षातील काही आमदारांनी ही नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यापर्यंत पोहोचवली असून, प्रफुल पटेल यांच्या भूमिकेमुळे पक्ष अडचणीत येत असल्याची तक्रार केल्याचे समजते. त्यामुळे अडचणीत भरच पडली आहे.

Sunetra Pawar, praful patel
Operation Tiger Update : अखेर भूकंप झालाच... ठाकरेंच्या 6 खासदारांचा वेगळा गट स्थापन; विलीनीकरणाचा मार्ग मोकळा

गेल्या काही दिवसापासून पटेल हे केंद्रात मंत्रिपद आणि पक्षातील कार्याध्यक्षपद मिळावे, यासाठी आग्रही आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या मोदी सरकारच्या विस्तारात राज्यमंत्री देण्याची तयारी भाजपकडून दर्शविण्यात आली होती. मात्र त्यांनी राज्यमंत्रिपदाऐवजी कॅबिनेट पद मागितले होते. दुसरीकडे खासदारांची संख्या नेमकी कमी असल्याने कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले नव्हते.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर प्रफुल पटेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलेल्या या चर्चांबाबत पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com