Pratap Sarnaik : शिंदेंच्या सूचनेनंतर प्रताप सरनाईक मैदानात; शिवसेनेच्या मंत्र्यांसह प्रमुख नेत्यांनाही दिला इशारा

Pratap Sarnaik Diwali Gift Gistribution For Tribal Families : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन दिवाळी साजरी केली. तसेच सुमारे दोन लाख शेतकरी कुटुंबांपर्यंत दिवाळीचा फराळ पोहोचवण्याची जबाबदारी घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Transport Minister Pratap Sarnaik
Transport Minister Pratap SarnaikSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Political News : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी शिवसेनेने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना वंचित घटकांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदिवासी पाड्यांवर जाऊन दिवाळी साहित्याचे वाटप केले. या उपक्रमांतर्गत सुमारे ३५० आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्य, दिवाळी फराळ, शालेय उपयोगी वस्तू आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले. तसेच राज्यातील सुमारे दोन लाख शेतकरी कुटुंबांपर्यंत दिवाळीचा फराळ पोहोचवण्याची जबाबदारी घेतल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले की, राज्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, सुमारे ३०० ते ३५० तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. अशा संकटाच्या काळात शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी बांधवांच्या घरातही दिवाळीचा आनंद पोहोचणे आवश्यक आहे. आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतो; मात्र समाजातील वंचित घटकांसोबत हा सण साजरा केल्यास त्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण होतो. संकटाच्या काळात सरकार आणि शिवसैनिक आपल्या पाठीशी आहेत, हा विश्वास त्यांना मिळतो.

Transport Minister Pratap Sarnaik
Pratap Sarnaik On Jitendra Awhad threat : जितेंद्र आव्हाडांना धमक्या, सरनाईकांचा आनंद परांजपेंकडे पाहून टोला; नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदार विविध भागांत जाऊन या उपक्रमात सहभागी होत आहेत. आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्य, फराळ, शालेय साहित्य आणि फटाक्यांचे वाटप केले जात आहे. या उपक्रमाला सर्वसामान्य नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही सरनाईक यांनी नमूद केले.

पक्षवाढीसाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीबाबत बोलताना प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. राज्यभरात पक्षसंघटना अधिक मजबूत करायची असेल, तर तळागाळातील कार्यकर्त्यांपासून मंत्र्यांपर्यंत प्रत्येकाने पक्षाची ध्येयधोरणे आणि वरिष्ठांच्या सूचनांनुसार जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. पक्षाने दिलेल्या सूचनांनुसार योग्य प्रकारे काम न करणाऱ्यांना पक्षप्रमुख खडेबोल सुनावू शकतात, अशी स्पष्ट भूमिकाही सरनाईक यांनी मांडली.

एसटी महिला प्रवाशांना ३१ डिसेंबरपर्यंत सवलतीची मुदतवाढ

एसटी महामंडळाच्या महिला प्रवाशांसाठीच्या सवलतीबाबतही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची माहिती दिली. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत एनसीएमसी (NCMC) कार्डची विक्री करण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे एक कोटी ४० लाखांहून अधिक कार्ड वितरित करण्यात आले आहेत. मात्र, काही कार्डांचे वितरण अद्याप बाकी असल्याने महिला प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सवलतीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

महामंडळाने यासंदर्भात परिपत्रक काढले असतानाही काही विभाग नियंत्रक (DC) चुकीच्या पद्धतीने काम करत असतील किंवा महिला प्रवाशांना त्रास देत असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही सरनाईक यांनी दिला. सुट्ट्यांच्या काळात महिला प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Transport Minister Pratap Sarnaik
Pratap Sarnaik Narendra Mehta dispute : सरनाईक-मेहता पुन्हा आमनेसामने; ‘बेकायदा बांधकाम’च्या आरोपांनी मिरा-भाईंदरमध्ये खळबळ

बेसनाच्या लाडूंची सरनाईक यांनी सांगितली आठवण

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आईशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवणही प्रताप सरनाईक यांनी सांगितली. संजय राऊत यांच्या आईचा आशीर्वाद आपण दरवर्षी घेतो. त्या आवर्जून आपल्यासाठी बेसनाचे लाडू बनवून पाठवतात, असे सरनाईक म्हणाले.

मध्यंतरी काही कारणांमुळे त्यांची भेट घेता आली नव्हती. काही दिवसांपूर्वी रात्री दीडच्या सुमारास त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यावेळी आपण त्यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. गेल्या वर्षी भेटता आले नाही; मात्र यंदा दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्की येईन, असे त्यांना सांगितले होते. यंदाही त्यांनी आपल्यासाठी बेसनाचे लाडू पाठवले असून, कुटुंबीयांसाठीही लाडू दिल्याची आठवण प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.