Maharashtra Government: ऑनलाईन पोर्टल ठप्प झाल्याने 'या' योजनांच्या अर्जांना मुदतवाढ; विद्यार्थ्यांनो अंतिम तारीख जाणून घ्या!

OBC Bahujan Kalyan Department Swayam Yojana: शासकीय वसतीगृह योजना, पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे.
OBC Bahujan Kalyan Department  Swayam Yojana
OBC Bahujan Kalyan Department Swayam YojanaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, मुदतीपूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन पोर्टलवर येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे पात्र विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी शासकीय वसतीगृह योजना, पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे.

आता विद्यार्थ्यांना येत्या १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने आपले अर्ज दाखल करता येणार आहेत. इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या संचालक सोनाली मुळे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

प्रादेशिक अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

संचालनालयाने सर्व प्रादेशिक उपसंचालक आणि सहाय्यक संचालकांना यासंदर्भात खालीलप्रमाणे कडक सूचना व मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत:

OBC Bahujan Kalyan Department  Swayam Yojana
Nagpur News: नागपूर पदवीधरमध्ये ट्विस्ट; शरद पवारांच्या पक्षाचे कराळे गुरुजी अपक्ष लढणार? वंजारी-कोहळेंचं टेन्शन वाढलं!

ऑफलाईन अर्जांची सुविधा:

ऑनलाईन प्रणाली पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत सर्व गरजू विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.

नियमांनुसार छाननी:

ऑफलाईन प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी, छाननी आणि पुढील कार्यवाही शासनाच्या प्रचलित नियम, निकष व पात्रतेच्या अटींनुसारच केली जाईल.

विद्यार्थी वंचित राहणार नाहीत:

केवळ तांत्रिक अडचणींमुळे कोणताही पात्र विद्यार्थी या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाही, याची पूर्ण दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी.

OBC Bahujan Kalyan Department  Swayam Yojana
Amravati News: अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपच्या 3 नेत्यांचं बंड; शिवसेनेच्या माजी आमदारांनीही थोपटले दंड

तांत्रिक अडचणींमुळे मोठा निर्णय

संबंधित योजनांच्या ऑनलाईन पोर्टलवर अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून व विविध स्तरांतून प्राप्त झाल्या होत्या. या समस्येची गंभीर दखल घेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मा. सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक झाली.

ऑनलाईन पोर्टल सुरळीत चालत नसल्याने कोणत्याही पात्र विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये आणि प्रवेश प्रक्रियेवर विपरीत परिणाम पडू नये, यासाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची सुविधा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com