Sharad Pawar News : स्टॅलिन यांची मनधरणी फेल; राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेते आता शरद पवारांच्या भेटीला!

INDIA Alliance Meets Sharad Pawar Over Delimitation : डीएमकेचे प्रमुख स्टॅलिन यांची चेन्नईत भेट घेऊन इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शिष्टाईचा प्रयत्न केला. मात्र त्यांची मनधरणी करण्यात यश आले नसून राहुल गांधींसह आता इंडिया आघाडीचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहचले.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून इंडिया आघाडीत मतभेद उफाळून आले आहेत. डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांची चेन्नईत भेट घेऊन इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश आले नसल्याची चर्चा आहे. स्टॅलिन यांच्याशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता राहुल गांधींसह इंडिया आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून विरोधकांमध्ये एकजूट घडवून आणण्याच्या प्रयत्नांना आता शरद पवारांच्या भूमिकेमुळे नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात विरोधकांची एकजूट करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री तथा डीएमकेचे प्रमुख एम.के. स्टॅलिन यांच्याशी चर्चा केली. जवळपास ७० मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतरही डीएमकेने आपली भूमिका कायम ठेवत विधेयकाबाबत स्वतंत्र भूमिका जाहीर केली. त्यामुळे इंडिया आघाडीच्या एकजुटीच्या प्रयत्नांना पहिल्याच टप्प्यात धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

स्टॅलिन यांच्याशी झालेली चर्चा अपेक्षित परिणाम साधू शकली नसल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा दिला जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे पवार यांनी विरोधकांच्या भूमिकेला साथ द्यावी, यासाठी राहुल गांधी स्वतः भेट घेऊन चर्चा करत असल्याचे चित्र आहे. आता या भेटीत पवारांची मनधरणी करण्यात राहुल गांधी यांना कितपत यश मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar
MK Stalin news : राहुल गांधी, ममतादीदी घरातून बाहेर पडताच स्टॅलिन यांची मोठी घोषणा; म्हणाले, दुसरा पर्याय नाही!

दरम्यान, राहुल गांधी यांनी स्टॅलिन यांच्याशी चर्चा करताना मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा तामिळनाडूच्या हक्कांवर आणि राज्याच्या प्रतिनिधित्वावर संभाव्य परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका मांडली. भाजप आणि आरएसएसच्या राजकारणामुळे तमिळ जनता, तमिळ भाषा आणि संस्कृतीच्या हिताला बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तामिळनाडूच्या हक्कांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी इंडिया आघाडीने एकत्रित भूमिका घ्यावी, अशी विनंती नेत्यांनी स्टॅलिन यांना केली. तब्बल ७० मिनिटे चर्चा करूनही डीएमकेची भूमिका बदलण्यात इंडिया आघाडीच्या नेत्यांना यश आले नसल्याचे समोर आले.

Sharad Pawar
BJP Dinner Diplomacy : दिल्लीत पडद्यामागे हाय-व्होल्टेज घडामोडी; विशेष अधिवेशनाआधी भाजपचा 'मास्टरप्लॅन'; राज्यनिहाय खासदारांसाठी 'डिनर डिप्लोमसी'

मात्र, स्टॅलिन यांनी तामिळनाडूच्या हिताला प्राधान्य देत मतदारसंघ पुनर्रचनेबाबत पक्षाची स्वतंत्र भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले. पक्षाच्या खासदारांची बैठक यापूर्वीच पार पडली असून, त्यामध्ये मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधातील भूमिका आणि त्यासाठी सुरू असलेल्या लढ्याबाबत चर्चा करण्यात आली होती. इंडिया आघाडीच्या नेत्यांसमोरही डीएमकेने आपली भूमिका स्पष्टपणे मांडल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार यांच्या भूमिकेकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.