Bharat Gogvale : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा तापला; गनिमी कावा करण्याचे गोगावलेंचे संकेत

Raigad guardian minister News : शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील रंगली होती. त्याचमुळे या ठिकाणच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली असल्याचे समजते.
Bharat Gogawale
Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Raigad News : राज्यातील पालकमंत्रीपदाची नियुक्ती करून आठवडा उलटला तरी त्यामुळे वाद चांगलाच रंगला आहे. विशेषता नियुक्ती करण्यात आलेल्या पालकमंत्रीपदापैकी रायगड, नाशिक येथील नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील रंगली होती. त्याचमुळे या ठिकाणच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली असल्याचे समजते.

रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर नाराजीनाट्य घडले. यावेळी शिवसेनेच्या नेतेमंडळीने रस्त्यावर उतरून टायर जाळत आंदोलन केले होते. त्यामुळे मोठा वाद पाहावयास मिळाला होता. गेल्या काही दुस्वासापासून याच मुद्द्यावरून अदिती तटकरे व भरत गोगावले समोरासमोर आले आहेत. त्यामुळे वातावरण अद्याप तापलेलेच आहे.

Bharat Gogawale
Sunil Tatkare News : धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद कोणी दिले नाही? सुनील तटकरेंनी थेटच सांगितले कारण

रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली असली तरी पूर्वी ज्यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री म्हणून झाली आहे, तेच प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करतील असे ठरले होते. त्यामुळे रविवारी आदिती तटकरे यांनी झेंडावंदन केलं. यावर बोलताना आता भरत गोगावले (Bhart Gogavale) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Bharat Gogawale
Dharashiv Politics Controversy : प्रताप सरनाईक 'अ‍ॅक्शन मोड'वर; तानाजी सावंतांच्या जिल्ह्याचे आरोग्य सुधारण्यासाठी घेतला मोठा निर्णय

मंत्री म्हणून त्यांनी झेंडावंदन केले, आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही. यावेळी भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांचे नाव ना घेता निशाणा साधला. जो भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार, आव्हान स्वीकारून चालतो तोच यशस्वी होतो. मंगळवारी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, काही गोष्टी या गनिमी काव्याच्या असतात, असे गोगावले यांनी स्पष्ट केले.

Bharat Gogawale
Dharashiv News : धाराशिवमध्ये पाऊल टाकताच पालकमंत्री सरनाईकांची मोठी घोषणा; स्वागताला तानाजी सावंतांची दांडी

दरम्यान, यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनीही आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीच्या काळात आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री या आदिती तटकरे होत्या, त्यांना वैतागून आम्ही रायगड जिल्ह्यातल्या तीन आमदारांनी उठाव केला होता. त्यानंतर गुवाहाटीचे लोण संपूर्ण राज्यात पसरले होते . त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. त्यानंतर सुनील तटकरे यांची महायुतीच्या सरकारमध्ये मागच्या दाराने एन्ट्री झाली आणि त्यांनी मुलीला मंत्री बनवले पण पालकमंत्री हे उदय सामंत होते.

Bharat Gogawale
BJP News : भाजपची मोठी खेळी; शिंदे, अजितदादांना धक्का ? पालकमंत्री नसलेल्या 16 जिल्ह्यांची 'या' नेत्यांकडे जबाबदारी

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आली. यावेळेस सुनील तटकरे यांनी जादू केली आणि आपल्या मुलीला पालकमंत्रिपद दिले. त्यांच्याकडे काय जादू आहे ते माहित नाही. आम्ही पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले यांचे नाव जवळपास फायनल झाले होते, पण ते रात्रीतून कसे बदलले, असा प्रश्न दळवी यांनी उपस्थित केला. येत्या काळात मुख्यमंत्र्यांची भेट घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Bharat Gogawale
NCP News : राष्ट्रवादीपुढे असणार नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष बनवण्याचं लक्ष्य ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com