राज ठाकरेंचेही ‘जय श्रीराम’! : मराठी बाण्याला देणार हिंदूत्वाची जोड

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित (Raj Thackeray ayodhya visit)
Raj Thakre
Raj ThakreSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेही (Raj Thackeray) आता 'जय श्रीराम'चा नारा देणार आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितल्याप्रमाणे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाला आहे. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी शिवथीर्थ बंगल्यावर मनसेचे प्रमुख नेते आणि सरचिटणीस अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या आगामी महाराष्ट्र आणि अयोध्या दौऱ्याची माहिती दिली.

बाळा नांदागावकर म्हणाले, आजच्या बैठकीत राज ठाकरे यांचा अयोध्या आणि महाराष्ट्र दौरा याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्रातील सहाही विभागांमध्ये राज ठाकरे दौरा करणार आहेत. ६ डिसेंबरला पुण्यात एक छोटी बैठक आहे. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबादला होणार आहे. १६ डिसेंबरला पुन्हा पुण्यात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाणार आली आहे. तर, कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक निश्चित आहे, मात्र अद्याप तारीख ठरलेली नाही. तसेच उत्तर महाराष्ट्राची बैठक जळगावला आणि विदर्भातील अमरावती, नागपूर विभागाचीही बैठक होणार असल्याचेही नांदगावकर यांनी सांगितले.

Raj Thakre
"लवकरच चांगली-वाईट बातमी मिळेल..." : बाळा नांदगावकरांनी सस्पेन्स वाढवला

तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर जाण्याचाही निर्णय झाला आहे. मात्र अद्याप याची तारीख निश्चित होणे बाकी असून राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा संपल्यानंतर त्याचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. पण आमची अयोध्या दौऱ्याची तयारी झाली असल्याचेही नांदगावर यांनी स्पष्ट केले. याआधीही यावर्षी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा मार्चमध्ये निश्चित करण्यात आला होता. ९ मार्च या वर्धापनदिनाच्या आधी हा दौरा होणार होता. मात्र उत्तरेतील शेतकऱ्यांचे आंदोलन आणि कोरोनाची दुसरी लाट या पार्श्वभूमीवर हा दौरा लांबणीवर पडला होता.

Raj Thakre
सतेज पाटलांचा विजयी रथ सुसाट : जिल्हा बँकेत बिनविरोध

मात्र ऑक्टोबर महिन्यात माँ कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी कृष्णकुंजवर जावून राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्याचे दिलेले निमंत्रण स्वीकारण्यात आले होते. त्यानुसार आता अयोध्या दौरा निश्चित करण्यात आला आहे. कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांच्या भेटीवर बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले होते, ही भेट ठरवून झाली आहे. दोन्ही महाराज आहे. या भेटीत हिंदू राष्ट्र हा अजेंडा होता. राज ठाकरे यांच्यासारखा माणूस त्यांना हिंदूराष्ट्रासाठी योग्य वाटतो.

मराठी बाण्याला हिंदुत्वाची जोड:

राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. मात्र ही सत्ता स्थापन करताना शिवसेनेला आपली हिंदूत्वाची भूमिका काहीशी सौम्य करावी लागल्याचे मागील दोन वर्षात दिसून आले आहे. अशावेळी मनसेने मराठी बाण्याला हिंदूत्वाची जोड दिली आहे. त्यातच मनसे आणि भाजपची वाढती जवळीक पाहता हिंदूत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com