MNS leader statement : राज ठाकरेंच्या लाडक्या नेत्याचे युतीबाबत सूचक विधान; म्हणाले, 'ताकद दुप्पट होते, मात्र...'

Political News : ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येणार याची उत्सुकता लागली असतानाच राज ठाकरेंच्या लाडक्या नेत्याचे युतीबाबत सूचक विधान केले.
Raj Thackeray | Uddhav Thackeray
Raj Thackeray | Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज व उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आल्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. जुलै महिन्यात दोनवेळेस ठाकरे बंधुंची भेट झाली. त्यामुळे आता राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसे एकत्र कधी येणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राज ठाकरे यांनी रविवारी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येणार याची उत्सुकता लागली असतानाच राज ठाकरेंच्या लाडक्या नेत्याचे युतीबाबत सूचक विधान केले.

मातोश्रीवर तब्बल सहा वर्षानंतर जाऊन राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, या भेटीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या भेटीनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, या पोस्टमधून त्यांनी देखील मनसे व उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत सूचक विधान केले आहे.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Raj Thackeray Uddhav meeting : राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले, मला खूप....

दोन पक्ष एकत्र येऊन लढतात तेव्हा त्यांची ताकद 1+1 =2 अशी होते. पण जेव्हा 2 ठाकरे एकत्र येतात तेव्हा हीच ताकद 1+1=11 होते, असे सूचक विधान नांदगावकर यांनी केले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे (Raj thackeray) यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेबांच्या वास्तव्याने आमच्यासाठी पवित्र झालेल्या मातोश्रीत जाऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असेही नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Raj-Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना भेटले, भास्कर जाधव म्हणाले, युती झाली!

'दोन पक्ष एकत्र येऊन लढतात तेव्हा त्यांची ताकद 1+1 =2 अशी होते. पण जेव्हा 2 ठाकरे एकत्र येतात तेव्हा हीच ताकद 1+1=11 होते. आज उद्धव साहेबांना सगळ्यात मोठे आपुलकीचे गिफ्ट हे आज राजसाहेबांनी दिले आहे. बाळासाहेब हा सुवर्णक्षण बघायला आज खरच आपण हवे होता, आपला मातोश्री बंगला आज दोन्ही बंधूंना एकत्र बघून नक्कीच आनंदी झाला आहे.’ अशी पोस्ट नांदगावकर यांनी या भेटीवर केली आहे.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Raj Thackeray Surprise: उद्धव ठाकरेंना वाढदिनी दिले 'हे' सरप्राईज; मातोश्रीवर ठाकरे बंधुंची सहा वर्षानंतर गळाभेट

गेल्या महिन्यातच हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूनी आक्रमक होत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतला होता. त्यामुळे या एकत्र आलेल्या या दोन बंधूनी पाच जुलै रोजी मुंबईत विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधुंची उपस्थिती होती.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Raj –Uddhav Thackeray Alliance: राज-उद्धव ‘एक’ अन् काँग्रेसपुढे पेच ! महाविकास आघाडीत फूट?

हा मेळावा पार पडल्यानंतर तेव्हापासूनच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे युतीच्या चर्चेला मोठे उधान आले आहे.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
BJP Mahayuti Bhandara Bank : गोंदिया, चंद्रपूर जिंकले, आता महायुतीचे लक्ष भंडारा बँकेकडे; पटोले अन् पटेल यांच्या वर्चस्वाची लढाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com