

BJP News : राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील भाजपने 25 संभाव्या नेत्यांची यादी केंद्रातील वरिष्ठ नेत्यांना दिली होती. या यादीमधील अवघ्या चार जणांना संधी मिळणार होती. विदर्भातून माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव देखील या यादीमध्ये होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या एका महिला नेत्याचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीमधून राणा यांचे नाव बाद झाल्याची चर्चा आहे.
विदर्भातून एका अनुभवी महिला नेत्याला संधी मिळेल, असे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या महिला नेत्याला भक्कम संघ पार्श्वभूमी असल्याचे देखील सांगितले जात आहे. महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी भाजप या नावाला अधिक महत्त्व देत असल्याची चर्चा आहे.
राज्यसभेसाठी विविध नेत्यांकडून भाजपच्या वरिष्ठांना साकडे घालण्या येत आहे. मराठवाड्यातून माजी खासदार भागवत कऱ्हाड यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांचे देखील नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे. त्यामुळे मराठवाड्यातून उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार असल्याचे चित्र आहे. माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या देखील नावाची चर्चा होती. मात्र, लोकसभेला पराभूत झालेल्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी द्यायची नाही, असा भाजपचा वरिष्ठांनी अलिखित नियम केल्याने दानवे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.
सात जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. भाजपचे चार, राष्ट्रवादी, शिवसेनेचा प्रत्येकी एक असे महायुतीचे सहा उमेदवार सहज विजयी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याल एक जागा येणार असून त्यांचा अवघा एक उमेदवार विजयी होऊ शकते येवढे संख्याबळ त्यांच्याकडे आहे. मात्र, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) यांच्यात उमेदवारीवरून एकमत होताना दिसत नाही.
शरद पवारांच्या नावाला देखील अजून पाठींबा मिळालेल्या नाही. महाविकास आघाडी एकत्र बसून याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. मात्र, जर शरद पवार उमेदवार नसतील तर भाजप पाचवा उमेदवार उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडलेली दिसून येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.