

Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी 16 मार्चला सात जागांसाठी मतदान होणार आहे. या सात पैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार सहज विजयी होतील. तर, महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे. राज्यसभेची मुदत संपणाऱ्यांमध्ये शरद पवार यांचा देखील समावेश आहे. ते निवडणूक लढणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, ही एक जागेवर ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसने देखील दावा सांगितला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अंधारात ठेवून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या जागेबाबत चर्चा झाली आहे. सर्वाधिक 20 आमदार आपल्याकडे असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने राज्यसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे.
शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांना सोडणार का याची देखील चर्चा सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादीची विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत भाजपसोबतच राहिल्या तर ही जागा पवारांना सोडावी की नाही याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम असल्याचे देखील बोलले जात आहे.
दरम्यान, राज्यसभेची जागा मिळाल्यास आदित्य ठाकरे यांनी पुन्हा प्रियांका चतुर्वेदी यांनाच खासदार करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेतील अनेक वरिष्ठ नेते नाराज होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंची विधान परिषदेमधील मुदत देखील संपत आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांनी काँग्रेस पाठींबा देण्याची शक्यता आहे. तसेच त्या बदल्यात राज्यसभेची जागा काँग्रेसला देत ठाकरेंच्या शिवसेनेनी पाठींबा द्यावा,अशी रणनीती काँग्रेस नेत्यांकडून आखली जात असल्याचे देखील चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.