MLC Election Results : मोठे मोठे गार केले गंमत मधी! का होतीय 'या' दोन उमेदवारांची चर्चा; भाजप, काँग्रेसनेही घेतलाय धसका!

Raviraj Sable Nitesh Karale : दोन्ही उमेदवार विजयापासून दूर आहेत. मात्र, त्यांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस, भाजप आणि सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमदेवारांचे गणित बिघडले आहे.
Raviraj Sable Nitesh Karale
Raviraj Sable Nitesh Karalesarkarnama
Published on: 
Updated on: 

MLC Election Results : आज विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत तीन महायुतीचे आणि दोन महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा होते आहे ती अपक्ष लढणाऱ्या दोन उमेदवारांची. एक म्हणजे मराठवाडा पदवीधर म्हणून लढणारे रविराज साबळे आणि नागपूरमधून लढणारे नितेश कराळे यांची.

हे दोन्ही उमेदवार विजयापासून दूर आहेत. मात्र, त्यांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस, भाजप आणि सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमदेवारांचे गणित बिघडले आहे. नितेश कराळे यांनी तब्बल २४ हजार २४९ मते घेतली आहेत. त्यांच्या या मतांमुळे काँग्रेसचे अभिजीत वंजारी हे डेंजर झोनमध्ये आले आहेत. तर, भाजपचे उमेदवार यांच्याकडे केवळ चार हजारांची आघाडी आहे. त्यामुळे दुसऱ्या मताच्या पसंतीवर विजयी उमेदवार ठरणार असल्याचे चित्र आहे.

कोणतीही मोठी यंत्रणा नसता केवळ सोशल मीडियामध्ये प्रचार करणाऱ्या नितेश कराळे यांनी घेतलेल्या मतांमुळे भाजप उमेदवाराने देखील आश्चर्यचकीत झाला. तर, काँग्रेस उमेदवार पराभवाच्या छायेत आहे.

नितेश कराळे म्हणाले, माझ्यामागे कोणती संघटना नाही. दोन राष्ट्रीय पक्षांची नाका तोंडात पाणी जाईपर्यंत मी घाईस आणलं आणि त्यांना चांगलं घाम फोडला. मला 25 हजार मतं मिळाली. या सर्व लोकांची मी आभार मानतो.

Raviraj Sable Nitesh Karale
MLC Election Result Live Updates : इम्रान खानला अंतरिम दिलासा; भारत सोडण्याच्या नोटिशीला स्थगिती

रविराज साबळेंमुळे चव्हाण पराभूत?

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात तीन वेळा आमदार झालेले सतीश चव्हाण हे पराभवाच्या छायेत आहेत. अपक्ष रविराज साबळे यांनी घेतलेली 20 हजार मतांमुळे त्यांचे गणित बिघडल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील हे विजयी होण्याची शक्यता आहे.

साबळे म्हणाले की, साबळे यांच्या दुसऱ्या पसंतीची मतंच महायुतीचे सतीश चव्हाण आणि महाविकास आघाडीचे डाॅ. प्रतापसिंह पाटील यांचे भवितव्य ठरणार आहे. माझ्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निवडून येणारा आमदार ठरणार आहे. मी एक प्रस्थापित गिळलायं, अठरा वर्षांचा दुष्काळ संपवलायं, अशा सूचक शब्दात रविराज साबळे यांनी महायुतीचे तीन टर्म आमदार असलेल्या सतीश चव्हाण यांना टोला लगावला.

Raviraj Sable Nitesh Karale
MLC Election Result 2026: भाजप खासदाराची बहीण, आमदाराचे मेहुणे मतमोजणीतून बाद; शिवसेनेच्या सरनाईकांची आघाडी कायम!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com