RBI : 'RBI' चा मुंबईतील बँकेवर सर्जिकल स्ट्राईक! लादले कडक निर्बंध; ग्राहकांमध्ये खळबळ

RBI Action on Co-operative Bank : भारतीय रिझर्व्ह बँकेने ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे मुंबईतील एका सहकारी बँकेवर कडक निर्बंध लादले असून ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
RBI
RBI Sarkarnama
Published on
Updated on

RBI Restrictions News : नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेने ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. यामुळे सहकार क्षेत्रातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली होती. ही खळबळ अद्याप शांत झाली नसतानाच आरबीआयने पुन्हा एकदा एका सहकारी बँकेवर कडक निर्बंध लादले आहेत. यामुळे आरबीआयच्या कारवाईचा धडका सुरूच असल्याचे समोर आले असून मुंबईतील ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.

आरबीआयने 18 मे रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण येथील द यशवंत सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता. तर कारवाई करत बँकेला सर्व बँकिंग व्यवहार थांबवण्याचे आदेशही दिले होते. तर बँकेकडे पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाची साधने नसल्याचे कारण देत बँकेचे कामकाज सुरू ठेवल्यास ठेवीदारांचे हित धोक्यात येईल, असे आरबीआयने स्पष्टीकरण देत निर्णय घेतल्याचे सांगितले होते. तर ठेवीदारांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सहकार आयुक्तांना बँकेची नोंदणी रद्द करून लिक्विडेटर नेमण्याचे आदेश दिले होते.

या कारवाईमुळे राज्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. या कारवाईला अद्याप 1 महिनाही होत नाही तोच आरबीआयने ग्राहकांच्या हिताचा विचार करत मुंबईतील मोगावीरा सहकारी बँकेवर कडक निर्बंध लादले आहेत.

RBI
RBI policy : राहुल गांधींना आर्थिक त्सुनामीची भीती, आता रिझर्व्ह बँकेने वाढविले सर्वसामान्यांचे टेन्शन; मोदी सरकारही चिंतेत

बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने बँकेवर अनेक निर्बंध लादले असून ते पुढील सहा महिन्यांसाठी असतील. तर या कालावधीत खातेदारांना जास्तीत जास्त 1 लाख रुपये काढण्याची परवानगी आरबीआयने दिली आहे.

आरबीआयने मोगावीरा सहकारी बँकेवर 12 जून रोजी कामकाज संपल्यानंतर हे निर्बंध लादले असून ते पुढील सहा महिन्यांसाठी आहेत. तर या कालवधीत आरबीआयकडून वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान आता या निर्बंधांमुळे बँकेच्या व्यवहारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून याचा खातेदारांना फटका बसणार आहे.

RBI
RBI gold sale : PM मोदींकडून सोनं न घेण्याचे आवाहन अन् 'आरबीआय'ने 12 अब्ज डॉलर किंमतीचे सोने विकल्याची बातमी; बँकेनेच केला खुलासा...

आरबीआयने लादलेल्या निर्बंधानुसार, बँकेला आता कोणतेही नवीन कर्ज मंजूर करता येणार नाही. सोबतच सध्याच्या कर्जाचे नूतनीकरणही करता येणार नाही. तर कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीवर बंधन असणार असून कर्ज घेणे किंवा नवीन ठेवी स्वीकारण्यावरही बंदी असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com