

Rohit Pawar press conference : अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी बदलेल्या वर्तुणुकीवर, विशेष करून सुरक्षिततेविषयी मुद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावे केले आहे.
प्लास्टिक बाटली बदलून, काचेच्या पाणी बाटलीपर्यंत आणि अलीकडच्या काळात त्यांच्या जवळच्या मित्रांकडे विमान खरेदीच्या आग्रहापर्यंत, मुद्यांवर बोट ठेवत आमदार रोहित पवार यांनी, त्यांच्या मनात असलेल्या अनेक शंकांना वाट मोकळी करून दिली आहे. परंतु यामुळे राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात रोहित पवार यांच्या शंकामुळे मोहोळ उठलं आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत , प्लास्टिक ते काचेच्या पाणी बाॅटलवरून अजितदादा सुरक्षिततेच्या दृष्टीकने किती सर्तक झाल्याचे सांगितल्यानंतर, अजितदादांन मित्राने घेतलेल्या हेलिकाॅप्टरची माहिती रोहित पवार यांनी दिली. या माहितीवर अजितदादांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून, ते सुरक्षिततेबाबती किती सतर्क होते, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधले.
रोहित पवारांनी, अजितदादांना (Ajit Pawar) सांगितले होते की, दादा माझ्या मित्राने हेलिकाॅप्टर घेतले. त्यावर दादांनी रोहित पवारांना, तो तुझा विश्वासू मित्र आहे का? असा प्रतिप्रश्न केला होतो. रोहित पवारांनी होकारार्थी उत्तर दिल्यावर त्याचेच हेलिकाॅप्टर वापर, बाहेरून तू घेऊ नको, आम्ही आताच्या काळात बरचं काही वेगळं ऐकलं आहे, असे दादांनी म्हटले होते. यातून अजितदादांना काहीतरी मला सांगायचा होता, तसा त्यांचा प्रयत्न होता, असा दावा रोहित पवार यांनी केला.
तसंच, दादांनी त्यांच्या जवळच्या लोकांना, म्हणजे आर्थिक परिस्थिती बरी असलेल्यांना, चांगला व्यावसायिक असलेल्या मित्रांना, सांगून ठेवलं होती की, तुम्हाला विमान घ्यावा लागेल. विमान तू घे, म्हणजे मला ते वापरता येईल, ते असे काय बोलत होते, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधले.
'पण शेवटी आता दादांबरोबर झालेले सगळे संभाषण, डोक्यात टेप रेकाॅर्डिंगसारखं पळत आहे, ते डोक्यातून जात नाहीत, काचेच्या बाटलीपासून ते स्वतः विमान असण्यापर्यंत, या गोष्टी त्यांच्या मनामध्ये का होत्या? ते तसेच राहून गेले,' असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी 'सीआयडी'ला काम दिलं आहे. पण तिथं 'सीआयडी'ला जाण्याची परवानगी आहे का? त्यांच्या अधिकाऱ्यांकडे चौकशीसंदर्भात विचारणा केल्यावर, एअरपोर्टचे सीसीटीव्ही घेतल्याचे सांगितले. यात एवढा वेळ जाणार असेल, तर संबंधित विमान कंपनी सर्व पेपर मॅनिप्युलेट करू शकते. पुरावे मॅनिप्युलेट केले जाऊ शकतात. थोडं दिवस थांबू, लोकं विसरून जातील, पण इथं असं काही होणार नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
'सीआयडी'ला संपूर्ण अॅथोरिटी नसणार आहे. विमानतळावर खाकी वर्दीला परवानगी नसते. तिथं फक्त केंद्रीय संस्थांनाच परवानगी असते. इथं 'सीआयडी' तपास करू शकत नाही. ते क्रिमिनल तपास करू शकतं. हा विषय एअरपोर्टशी निगडीत आहे. त्यामुळे इथं अनुभवी एजन्सी तपासासाठी द्यावी लागणार आहे. एक इंडियाची घ्या आणि एक बाहेर देशाची तपास एजन्सी घ्या, अशी आमची मागणी आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.