Rupali Chakankar Resignation : रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याआधी पडद्यामागे काय घडलं? 'त्या' बैठकीत निर्णय झाला अन्...

Rupali Chakankar Resigned Inside Story : शुक्रवारी सकाळी रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. या संवादामध्ये सुनेत्रा पवार यांनी चाकणकरांना राजीनामा देण्याबाबत सांगितले.
Sunetra Pawar Rupali Chakankar Resignation
Sunetra Pawar Rupali Chakankar Resignationsarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar News : राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला. अशोक खरात प्रकरणानंतर चाकणकर यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता. त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती.

राजीनाम्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत होत नसल्याची चर्चा होती. लगेच राजीनामा नको असे एका गटाचे मत झाले होते. तर, महिला आघाडी मात्र रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होता. राजीनाम्या संदर्भात सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले होते. त्यामुळे नेमका काय निर्णय होणार याबाबत पक्षात चर्चा होती.

मंगळवारी सुनेत्रा पवार यांचे निवास्थान देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. अशोक खरात प्रकरणामुळे सामन्या माणसांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे मुद्दे काही जणांकडून मांडण्यात आले. वरिष्ठांकडून चाकणकर यांचा राजीनामा घेण्याबाबत एकमत झाले. सुनेत्रा पवार यांनी देखील त्याला हिरवा झेंडा दाखवल्याचे सुत्रांनी सांगितले.

Sunetra Pawar Rupali Chakankar Resignation
Rupali Chakankar News: सर्वात मोठी बातमी: रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत

शुक्रवारी सकाळी रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. या संवादामध्ये सुनेत्रा पवार यांनी चाकणकरांना राजीनामा देण्याबाबत सांगितले. त्यानंतर चाकणकरांनी रात्री उशीरा आपला राजीनामा सुपूर्द केला.

दरम्यान, महिला आयोगाचा राजीनामा देताना वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला होता. मात्र, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताना अवघ्या दोन ओळत राजीनामा देत राजीनामा देण्याचा उल्लेख चाकणकरांकडून करण्यात आला नाही. पुढील वाद टाळण्यासाठी अवघ्या दोन ओळीत त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

ट्विटरवर पोस्ट करत रुपाली चाकणकर म्हणाल्या, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते वेदनादायक आहे.सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच.

हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा,ही माझी मागणी मी यापूर्वीच मा.मुख्यमंत्रीा .उपमुख्यमंत्री,मा.पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.

Sunetra Pawar Rupali Chakankar Resignation
Rupali Chakankar : राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्याकडून रुपाली चाकणकरांना हटवायला फिल्डिंग? नाशिकच्या जिल्हाध्यक्षांना कोणाचा आशीर्वाद?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com