

Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून फुटून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय सहा खासदारांनी घेतल्याचे जवळपास आता स्पष्ट झाले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे कार्यकर्त्यांशी बोलून चर्चा घेणार असल्याचे म्हणत असले तरी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी त्याआधीच आपण शिवसेनेत गेल्याचे जाहीर केले आहे. खासदार संजय राऊत यांच्या विधानांवरून या खासदारांमध्ये संताप असल्याचेही समोर आले आहे.
पक्षाचे सहा खासदार फुटणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दिल्लीत संजय राऊत यांचा भडका उडाला होता. आता राज्यात ऑपरेशन तुडवा सुरू होईल, असे ते म्हणाले होते. तसेच फुटीर खासदारांविषयी त्यांनी पत्रकार परिषदेत अपशब्दांचा वापर केला होता. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. त्यानंतर आता राऊतांचे हे शब्द सहा खासदारांच्याही चांगलेच जिव्हारी लागले आहेत.
खासदार आष्टीकर यांनीच एका व्हिडीओच्या माध्यमातून यावर भाष्य करत थेट सूचक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काही मंडळी रागाच्या भरात असंविधानिक बोलत आहेत. हात जोडून विनंती आहे, असंविधानिक बोलू नका. राग व्यक्त करा, पण असे बोलू नका. एकदा माणसाची मने तुटल्यानंतर परत जुडत नाहीत. सर्वांना सोबत राहावे लागते, काम करावे लागते.
माझ्यासोबत कुणाला यायचे नसेल तर नका येऊ पण मी तुमच्यासोबत राहीन. पण जहरी बोलणे टाळले पाहिजे. झोडायला आणि तोडायला कुणीच कमी नसते. या सगळ्याचा विचार करूनच माणूस करत असते. कदाचित नकळत कुणीतरी असे ऐकून काही करायचा प्रयत्न झाला, तर त्यानंतरचे परिणाम काय होऊ शकतात, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे असे असंविधानिक वागू नका, असे आष्टीकर म्हणाले आहेत.
राऊतसाहेब किंवा इतर मोठी मंडळी बोलत असतील तर तो त्यांचा हक्क आहे. ते माझ्या वडिलांप्रमाणे आहेत, मला त्याचे वाईट वाटणार नाही. आम्ही १८ तारखेपर्यंत कुणीच कुठे गेलो नव्हतो. पण ज्यापध्दतीचे गैरविश्वास किंवा बोलण्याचा अतिरेक झाला, त्यानंतर बऱ्याचशा मंडळींनी विचार केला की, आता इथे थांबूनही काही अर्थ नाही, असे आष्टीकरांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.