Sharad Pawar News: मोदी सरकारच्या मोठ्या निर्णयावर बहिष्काराचं आवाहन; शरद पवारांनी संजय राऊतांंना फटकारलं

Sanjay Raut On Modi Government : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या शिष्टमंडळ पाठवण्याच्या निर्णयावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं.
Sanjay Raut on Sharad Pawar
Sanjay Raut on Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News: केंद्रातील मोदी सरकारकडून ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी पावलं उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारनं सात जणांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली असून त्यांच्यावर भारत-पाकच्या अलिकडच्या लष्करी संघर्षाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बाजू मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.मात्र,दुसरीकडे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केंद्राच्या विविध देशांमध्ये शिष्टमंडळे पाठवण्याच्या निर्णयावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं. याचवरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राऊतांना फटकारलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार यांनी सोमवारी(ता.19)बारामतीमध्ये माध्यमांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांच्या केंद्र सरकारच्या विविध देशांत शिष्टमंडळ पाठवण्याच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देताना भारताच्या जागतिक स्तरावरील प्रयत्नांमध्ये स्थानिक पातळीवरील राजकारण न आणण्याचा सल्ला देत अप्रत्यक्षरित्या कानच टोचले आहे.

शरद पवार म्हणाले,आंतरराष्ट्रीय प्रश्न उद्भवल्यानंतर पक्षीय राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्त्वात संयुक्त राष्ट्रात शिष्टमंडळ पाठवले होते. त्याचे आपण सदस्य होतो,अशी आठवणही पवारांनी यावेळी करुन दिली.

संजय राऊत (Sanjay Raut) यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण, त्यांच्या शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे एक सदस्य या शिष्टमंडळात आहे. स्थानिक पातळीवरील राजकारण या मुद्द्यात आणू नये. तसेच आंतरराष्ट्रीय प्रश्न उद्भवल्यानंतर पक्षीय राजकारण बाजूला ठेवायला हवं,असंही पवार यांनी यावेळी सांगितलं होतं.

Sanjay Raut on Sharad Pawar
Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? जयंत पाटील, रोहित पवार लवकरच फडणवीसांच्या मंत्रिमंडळात..? 'या' बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

केंद्र सरकारनं पहलगाम हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानकडून झालेल्या कुरापतींवर भारताची भूमिका मांडण्याची जबाबदारी सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडे दिली आहे. ते काही देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडणार आहेत. तर प्रियांका चतुर्वेदी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांच्यासह काँग्रेसचे शशी थरुर, भाजपचे रविशंकर प्रसाद, बैजयंत पांडा, द्रमुकच्या खासदार कनिमोझी करुणानिधी, जेडीयूचे संजय कुमार झा यांचा समावेश आहे. मंत्री किरण रिजिजू यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून या संदर्भात घोषणा केली.

Sanjay Raut on Sharad Pawar
Uddhav Thackeray: '...तर संकटात सापडलेल्या ठाकरेंना पुन्हा सोन्याचे दिवस येणार!'; कट्टर भुजबळ समर्थक नेत्याचं मोठं विधान

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या शिष्टमंडळ पाठवण्याच्या निर्णयावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं. ही शिष्टमंडळं सरकारची पापं आणि गुन्हे यांचं समर्थन करतील,असं वादग्रस्त विधानही राऊतांनी यावेळी केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com