Shivsena News : एकनाथ शिंदे 13 खासदारांच्या बळावर मोठा डाव टाकण्याच्या तयारीत : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्यानंतरही दिल्लीतील हालचाली कायम

Political News : शिवसेनेच्या वाट्याला दोन केंद्रीय मंत्रीपदे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता शिवसेनेला केंद्रात तीन मंत्रीपदे मिळवीत, यासाठी लॉबिंग केले जात आहे.
Eknath Shinde appoints woman leader to key post
Eknath Shinde appoints woman leader to key postSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले होते. मात्र, आता अधिवेशनापूर्वी विस्तार होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. हा विस्तार लांबल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेला केंद्रात एकूण 3 मंत्रिपदं मिळवीत यासाठी लॉबिंग केले जात असल्याची माहिती आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बंड करून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे दिल्लीतील बळ वाढले आहे. पूर्वीचे सात खासदार व त्यानंतर आलेले सहा खासदार असे 13 खासदार झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना महायुतीमधील मोठा पक्ष झाला आहे.

वाढलेल्या बळामुळे एकनाथ शिंदे यांनी सध्याच्या एका मंत्रिपदासह आणखी एका मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरु केले होते. पण आता शिवसेनेला केंद्रात 3 मंत्रीपदे मिळवीत यासाठी लॉबिंग केले जात असल्याची माहिती आहे. शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट आणि दोन केंद्रीय राज्यमंत्रीपदे मिळावीत, अशी पक्षाची भूमिका आहे.

Eknath Shinde appoints woman leader to key post
Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे आता ताकही फुंकून पिणार, इंगवलेंच्या राजीनाम्यानंतर कोल्हापूरचा पुढचा 'सेनापती' कोण असणार?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची (Shivsena) साथ सोडत सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांच्या प्रवेशामुळे शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद वाट्याला येणार असल्याची चर्चा रंगली होती. याबाबत चार दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी नव्याने प्रवेश केलेले सहा खासदार उपस्थित होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, त्यातच आता केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एकूण तीन मंत्रीपदे मिळावीत, यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही आहे. यामध्ये एक कॅबिनेट मंत्री आणि दोन केंद्रीय राज्यमंत्री पदांचा समावेश असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे प्रादेशिक पक्षांना केंद्रीय नेतृत्वाकडून सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

Eknath Shinde appoints woman leader to key post
Modi Government : ठाकरेंना सोडून गेलेल्या बंडखोर खासदारांच्या मनसुब्यांना धक्का : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या वाट्याला येत असलेल्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी खासदार श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे ही दोन नावे चर्चेत आहेत. यापैकी एकाला संधी दिली जाणार आहे. तर राज्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आलेल्या खासदारापैकी ओम राजेनिंबाळकर, संजय जाधव, संजय दिना पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आता संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर होण्याची दाट शक्यता आहे. अधिवेशन संपल्यानंतर ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबर महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतरच विविध मित्रपक्षांना मिळणाऱ्या मंत्रीपदांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या संदर्भात केंद्र सरकार किंवा शिवसेनेकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com