Modi Government : ठाकरेंना सोडून गेलेल्या बंडखोर खासदारांच्या मनसुब्यांना धक्का : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट

Parliament Monsoon Session News : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 19 जुलैपूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता केवळ दोनच दिवस उरले असल्याने अधिवेशनापूर्वी विस्तार होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.
Narendra modi, Amit Shah
Narendra modi, Amit Shah sarkarnama
Published on
Updated on

New Dehli News : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले होते. मात्र, आता अधिवेशनापूर्वी विस्तार होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. 18 तारखेला दुपारपर्यंत विस्ताराबाबतच्या कोणत्याही हालचाली नव्हत्या. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 19 ते 25 जुलै दरम्यान पूर्व युरोपमधील तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे.

केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या (Narendra Modi) कॅबिनेटचा विस्तार गेल्या दोन वर्षाच्या काळात करण्यात आलेला नाही. आता आगामी काळात होणाऱ्या पंजाब आणि उत्तर-प्रदेश या महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेत येत्या काळात विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या विस्तारात एनडीएमधील अनेक घटक पक्षांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले होते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या सहा खासदारांच्या प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला दोन मंत्रिपदे येणार असल्याची चर्चा रंगली होती. चार दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी नव्याने प्रवेश केलेले सहा खासदार उपस्थित होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडीला वेग आला होता.

Narendra modi, Amit Shah
Maharashtra Budget 2026 Live Update : ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर टीका, म्हणाले,'चिखला प्रकरणाच्या माध्यमातून धनंजय मुंडेंना....'

पण आता पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 19 ते 25 जुलै दरम्यान पूर्व युरोपमधील तीन देशांच्या ऐतिहासिक राजकीय दौऱ्यावर जात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, राष्ट्रपतींचा हा दौरा मध्य आणि पूर्व युरोपियन देशांसोबत भारताचे राजकीय, आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभरात विस्तार होणे आता शक्य नसल्याने आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे.

Narendra modi, Amit Shah
Modi cabinet expansion : ‘ऑपरेशन टायगर’ने एकनाथ शिंदेंची दिल्लीत ताकद वाढली! केंद्रीय मंत्रिपदावरून प्रतापराव आऊट? श्रीकांत शिंदे इन? ओम राजेनिंबाळकरांची चर्चा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आता संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर होण्याची दाट शक्यता आहे. ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबर महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतरच एनडीएमधील विविध मित्रपक्षांना मिळणाऱ्या मंत्रीपदांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com