Solapur Politics: सोलापुरात नगरपालिकापाठोपाठ महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा 'धनुष्यबाण' जोरात; दुसऱ्या क्रमांकाची मते घेत प्रस्थापितांना दिला धोक्याचा इशारा!

Political News : आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे प्रत्येक पक्षाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde
Published on
Updated on

Solapur News : राज्यात नगरपालिकापाठोपाठ महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपने एकहाती वर्चस्व सिद्ध केले असले तरी दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दमदार कामगिरी करीत वर्चस्व सिद्ध केले आहे. नगरपालिकापाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा 'धनुष्यबाण' जोरात चालला आहे. त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेत प्रस्थापितांना धोक्याचा इशारा दिला आहे. तर त्यासोबतच आता आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे प्रत्येक पक्षाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत 5 नगरपालिका निवडणुकीत महत्त्वाच्या नगरपरिषदांवर आपला झेंडा फडकवला. या निवडणुकीत मोहोळमध्ये सिद्धी वस्त्रे, सांगोलामध्ये आनंद माने, मंगळवेढा नगरपालिकेत सुनंदा अवताडे, पंढरपूर नगरपालिकेत प्राणिता भालके तर दुधनी नगरपालिकेत प्रथमेश म्हेत्रे हे विजयी झाले होते. त्यासोबतच नगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत.

Eknath Shinde
Shivsena vs BJP : बंडखोर नेत्याला एकनाथ शिंदेंकडून पुन्हा 'चान्स'; थेट जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती : भाजपच्या नेत्यांमध्ये शिवसेनेविरोधात असंतोष

त्यासोबतच सोलापूर महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे प्रभाग क्रमांक 7 मधून तर प्रभाग 16 मधून प्रियदर्शन साठे यांच्यासह शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवून महापालिकेत अधिकृत प्रवेश केला आहे. एकेकाळी शिवसेनेचे 21 नगरसेवक असताना यंदाच्या निकालाने जुनी समीकरणे पूर्णपणे मोडीत काढली असून, शिंदे गटाने भाजपसोबत युती करून किंवा स्वतंत्रपणे आपली जागा निर्माण केली आहे.

Eknath Shinde
NCP Symbol Dispute : राष्ट्रवादीचं 'घड्याळ' कुणाचं? सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच 'तडजोडी'ची चर्चा; शरद पवार, अजितदादा एकत्र येणार?

महापालिका निवडणुकीत सदस्य संख्येनुसार भाजप (BJP) पहिल्या तर एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. मात्र, महायुती फिसकटल्याने भाजपला मित्र पक्षानेच निवडणुकीत आव्हान दिले होते. 26 पैकी 13 प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेली आहेत. एकंदरीत भाजपनंतर शिवसेनेला मिळालेल्या मतांची संख्या अधिक आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एमआयएम पक्षाचा क्रमांक लागतो.

Eknath Shinde
BJP News: भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचा पहिलाच धडाकेबाज निर्णय; महाराष्ट्राच्या दोन 'गेमचेंजर' नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेच अनेक ठिकाणी कडवे आव्हान दिले. होते. शहरातील एकूण 26 प्रभागांपैकी तब्बल 13 प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये शिवसेना हा मतांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रमुख पक्ष म्हणून पुढे आला आहे. प्रभागनिहाय निकालांचा विचार करता 13 प्रभागांमध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. त्याचप्रमाणे पाच प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरे स्थान पटकाविले. तर प्रत्येकी चार प्रभागांमध्ये काँग्रेस आणि एमआयएमला मते मिळाली आहेत.

Eknath Shinde
BJP News: भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचा पहिलाच धडाकेबाज निर्णय; महाराष्ट्राच्या दोन 'गेमचेंजर' नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

महापालिका निवडणुकीत भाजपने नाकारल्याने हिंदुत्व अन् राष्ट्रीयत्व याबाबत 'दक्ष' असलेल्या काहीजणांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला होता. त्यांचा पराभव झाल आणि भाजपने अभूतपूर्व यश मिळवले असले तरी भाजपमधील घडामोडींबाबत अनेक कार्यकर्ते समाधानी नाहीत. आता निवडणुका नसल्या तरी भविष्यात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे कल वाढू शकतो.

Eknath Shinde
Shivsena vs BJP : बंडखोर नेत्याला एकनाथ शिंदेंकडून पुन्हा 'चान्स'; थेट जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती : भाजपच्या नेत्यांमध्ये शिवसेनेविरोधात असंतोष

सोलापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग 2, 3, 6, 11, 12, 18, 19, 23,24 या प्रभागात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर प्रभाग क्रमांक 4, 5, 8, 20, 25 मध्ये राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. प्रभाग 12, 14, 15, 21, 26 मध्ये काँग्रेस दुसऱ्या स्थानी राहिली. प्रभाग क्रमांक 16, 17, 22 मध्ये एमआयएम दुसऱ्या स्थानी तर प्रभाग 13 मध्ये माकप, प्रभाग 1 वंचित, प्रभाग 9, 10 अपक्ष दुसऱ्यास्थानी राहिले.

Eknath Shinde
NCP Politics: महापालिका निवडणुकीतील अपयश झोंबलं, अजितदादा आता 'ZP' ला 'ती' मोठी चूक टाळणार? शरद पवारांची राष्ट्रवादी आपला हट्ट सोडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com