KDMC hospital case : "फडणवीसांनी गृहखात्याची पूजा घालावी..."; डॉक्टर-नर्सेस मारहाण प्रकरणात ठाकरेसेनेची एन्ट्री, आदित्य अन् राऊतांचा जोरदार हल्लाबोल

Kalyan Dombivli hospital assault case : ''देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यांच्याकडील गृहखात्याची पूजा घालावी, ज्या पांढऱ्या कपड्यातील देवदूतांनी करोना काळात जनतेची सेवा केली, त्या महिला डॉक्टर आणि नर्संना मिंधे टोळीचे गुंड इस्पितळात घुसून अमानुष मारहाण करतात, हे काय कायद्याचे राज्य आहे?'
Doctors and nurses protest after the alleged assault at KDMC Shastrinagar Hospital by Shiv Sena corporator Ramesh Mhatre and his supporters.
Doctors and nurses protest after the alleged assault at KDMC Shastrinagar Hospital by Shiv Sena corporator Ramesh Mhatre and his supporters. The incident has sparked a major political row in Maharashtra.Sarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli hospital assault Case : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सेसना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर डॉक्टर आणि परिचारिकांना बेदम मारहाण केल्या प्रकरणी ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्यासह त्यांच्या चार समर्थकांवर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव साळुंखे यांच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

या आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत संपावर जाण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनकडून देण्यात आला आहे. अशातच आता प्रकरणावर ठाकरेंच्या शिवसेनेते नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Doctors and nurses protest after the alleged assault at KDMC Shastrinagar Hospital by Shiv Sena corporator Ramesh Mhatre and his supporters.
Ramai Awas Scheme : फडणवीस-शिंदेंच्या नावाने बनावट कागदपत्रांचा खेळ! रमाई आवास योजनेत मोठा गैरव्यवहार; भाजपच्या माजी नगरसेविकेचा मुलगा मास्टरमाईंड?

'देवेंद्र फडणवीस यांनी आता त्यांच्याकडील गृहखात्याची पूजा घालावी, ज्या पांढऱ्या कपड्यातील देवदूतांनी करोना काळात जनतेची सेवा केली, त्या महिला डॉक्टर आणि नर्संना मिंधे टोळीचे गुंड इस्पितळात घुसून अमानुष मारहाण करतात, हे काय कायद्याचे राज्य आहे? या सगळ्यांची हातात बेड्या घालून ,चड्डी बनियन वर वरात काढा,' अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

तर आदित्य ठाकरे यांनीही ट्विटद्वारे एकनाथ शिंदेंच्या समर्थकांच्या कृत्यावरून फडणवीस यांना काही प्रश्न विचारले आहेत. आदित्य यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'डॉक्टरांनी शेअर केलेला व्हिडिओ पहा, 'फेकनाथ मिंधे' टोळीतील एका नगरसेवकाने रुग्णालयात जाऊन डॉक्टर आणि नर्सेसवर हल्ला केला. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय.

Doctors and nurses protest after the alleged assault at KDMC Shastrinagar Hospital by Shiv Sena corporator Ramesh Mhatre and his supporters.
Sharad Pawar News: शरद पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय! शिवनगर संस्थेत पार्थ-युगेंद्र पवारांची नियुक्ती; सुनेत्रा पवार उपाध्यक्षपदी

देवेंद्र फडणवीस आपल्या मित्रपक्षाची ही गुंडगिरी खपवून घेणार का? 'मिंधे' टोळीतील त्या गुंडाला अटक करून त्याचे नगरसेवकपद रद्द करतील का? की ते केवळ डॉक्टर आणि नर्सेसनाच नव्हे, तर सर्वांनाच असा संदेश देतील की महाराष्ट्रात अशा प्रकारची अराजकता चालते आणि ती त्यांना मान्य आहे?' असे प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com