Kunal Kamra Case News : कुणाल कामराला टेरर फंडिंग? राहुल कनाल यांच्या पोस्टने खळबळ

Rahool Kanal Over Kunal Kamra : प्रसिद्ध स्टँडप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष विडंबन गीत म्हटलं होतं. यामुळे तो सध्या अडचणीत आला आहे. यादरम्यान शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
Kunal Kamra
Kunal KamraSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराच्याविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक दिसत आहे. कार्यकर्त्यांनी कामराला दिसेल तेथे चोप देण्याची धमकी दिली असतानाच आता मंत्रिही मागे राहिलेले नाही. मंत्रीनंतर आधी आम्ही शिवसैनिक आहोत म्हणत कामराला टायरमध्ये घालून चोप देण्याची भाषा करत आहेत. अशातच कामराला दोन समन्सदेखील बजावण्यात आल्याने त्याच्या अडचणीत भर पडत आहेत. यादरम्यान, शिवसेनेच्या युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांची एका पोस्टने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. कुणाल कामराला सरकारविरोधात कंटेटचा प्रचार करण्याकरता टेरर फंडिंग झाल्याचा आरोप राहुल कनाल यांनी केला आहे. कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष विडंबन गीत म्हटलं होतं.

शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मुंबई पोलिसांनी पहिली नोटीस कामराला पाठवली होती. मात्र ती लागू झाली नाही. यामुळे पुन्हा त्याला दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. त्या नोटीसमध्ये त्याला खार पोलीस ठाण्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. ही नोटीस कामराच्या वडिलांच्या निवासस्थानी पाठवण्यात आली जी त्याच्या वडिलांनी घेतली. दरम्यान पहिल्या नोटीसवेळी कामरानं चौकशीला हजर राहण्यासाठी एक आठवड्याची वेळी मागितली होती. पण ती खार पोलिसांनी फेटाळत लगेच दुसरा समन्स काढला होता.

दरम्यान आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून राहुल कनाल यांनी कामराला टेरर फंडिंग झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे सध्या राज्यात खळबळ उडाली असून राहुल कनाल यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. राहुल कनाल यांनी दोन वेगवेगळे ट्विट केले आहेत.

Kunal Kamra
Shivsena Vs Kunal Kamra : ...म्हणून आम्ही शांत,पण आता कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देणार; 'या' मंत्र्यांमधला शिवसैनिक जागला

राहुल कनाल यांनी केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री अर्थमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरुद्धात सध्या बोललं जात आहे. बोला, जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणे हे सर्वांनाच पचत नाही. म्हणूनच कुणाल कोमरासारख्या कठपुतळ्यांना उभ केलं जातंय. दहशतवाद्यांकडून निधी घेऊन त्यांना पाठिंबा दिला जातोय. आपल्या देशाची आणि राज्याची अखंडता व कायदा सुव्यवस्थेला हानी पोहोचवली जात असल्याचा आरोपही राहुल कनाल यांनी केला आहे. तर कुणाल कामराचे यूट्यूब चॅनल बंद करण्याची आणि डिमॉनिटाइज करण्यासाठी युट्यूबला विनंती करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत आपण खार पोलीसांना पुरावे देणार असून यूट्यूब कार्यालयाला भेट याबाबत विनंती करणार असल्याचेही राहुल कनाल म्हणाले. तर आज (ता.28) यासाठी ते 11वाजता पुरावे खार पोलीसांना देणार आहेत. तर तक्रार करताना, कामराच्या बँक खात्याचीही चौकशी करण्याची मागणीही राहुल कनाल खार पोलीसांना केली आहे.

तर दुसऱ्या पोस्टमध्ये कनाल यांनी, “उद्या 12 वाजता खार पोलीस ठाण्यात भेटुया. मुंबई पोलिसांना विनंती करूया. माहिती तपासून कारवाई करण्याची मागणी करूया. युट्यूबलाही पत्र लिहिणार. त्यांनीही कारवाई करावी”, असे लिहले आहे.

Kunal Kamra
Kunal Kamra latest update : शिवसेनेच्या टार्गेटवर आलेल्या कुणाल कामराचे ‘MNS’च्या बड्या नेत्याने मानले जाहीर आभार, म्हटले...

दरम्यान वादाच्या भोवऱ्यात सापलेल्या कामरासाठी लोक आता हात सैल करताना दिसत आहेत. त्याच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असून मदतही करत आहेत. गेल्या दोन तीन दिवसांतच त्याला कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असून कुणालच्या खात्यावर तब्बल चार कोटी 7 लाख 80 हजार रुपयांची मदत जमा झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com