Shiv Sena party symbol hearing : शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणीबद्दल मोठी अपडेट: सुप्रीम कोर्टात आता 'या' तारखेला होणार सुनावणी

Supreme Court Shiv Sena case News : सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची बुधवारी अंतिम सुनावणी होणार होती. मात्र पुन्हा एकदा या सुनावणीसाठी पुढची तारीख देण्यात आली.
Supreme Court Hearing on Shivsena Name &Logo
Supreme Court Hearing on Shivsena Name &LogoSarkarnama
Published on
Updated on

New Dehlli News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सुप्रीम कोर्टात होत असलेल्या शिवसेना पक्ष आणि त्याच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हावरील सुनावणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची बुधवारी अंतिम सुनावणी होणार होती. मात्र पुन्हा एकदा या सुनावणीसाठी पुढची तारीख देण्यात आली असून त्यानुसार आता सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार आहे.

शिवसेना (Shivsena) पक्ष आणि त्याच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हावर गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली कायदेशीर लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी बुधवारी झाली. या महत्त्वपूर्ण सुनावणीत धनुष्यबाण चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला परत मिळेल की एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागेल, याबाबत उत्सुकता वाढली होती.

Supreme Court Hearing on Shivsena Name &Logo
BJP Politics : पदवीधर निवडणुकीत भाजपकडून महाविकास आघाडी चेकमेट, राष्ट्रवादीचा मुख्य चेहराच फोडला

बुधवारी सुनावणीवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार आहेत. त्यामुळे पक्ष व चिन्हांबाबतचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणी केली होती. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत यांनी या प्रकरणावरील पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार असल्याचे स्पष्ट केले.

Supreme Court Hearing on Shivsena Name &Logo
NCP Vs Congress : स्थानिकच्याआधी काँग्रेसला हादरा, तटकरेंच्या गळाला लागला काँग्रेसचा बडा नेता; तळकोकणात ताकदही वाढली

यावेळी कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादासाठी किमान 45 मिनिटांचा वेळ मागितला. यानंतर न्यायालयाने येत्या 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद होईल असे सांगत आजची सुनावणी संपली, असे जाहीर केले. त्यामुळे आता या प्रकरणावर 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. यानंतर खरी शिवसेना कोणाची यावर अंतिम फैसला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Supreme Court Hearing on Shivsena Name &Logo
Bachchu Kadu On BJP government : फडणवीसांचं शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर; बच्चू कडू रस्त्यावर, पेटवला सोयाबीन अन् कर्जमाफीसाठी 'अल्टीमेटम'

कोर्टाने महापालिका निवडणुका जानेवारीत आहेत, त्याआधी आपण ही सुनावणी निश्चित घेऊ, असे सांगत 12 नोव्हेंबर ही तारीख दिली आहे. येत्या 12 नोव्हेंबरला युक्तीवाद सुरु केला जाणार आहे. यात ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद होईल. त्यानंतर इतर लोक युक्तीवाद करतील. आज कोर्टाने 12 नोव्हेंबरपासून सुनावणी घेऊ असे सांगितले आहे. यानुसार 12, 13 आणि 14 अशा तीन दिवसात सुनावणी होईल, असाच त्याचा अर्थ आहे, असेही ॲड. असीम सरोदे यांनी या सुनावणीनंतर सांगितले.

Supreme Court Hearing on Shivsena Name &Logo
Shivsena UBT Crisis : तळकोकणात ठाकरेंची शिवसेना संकटात! ‘आऊट गोईंग’ही वाढले, नेत्यांचा भाजप-शिंदे गटाकडे ओढा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com