Shivsena News: बंडखोर खासदारांनी धनुष्यबाण हाती घेताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; 2029 च्या निवडणुकीची दाखवली झलक; 'ऑन दि स्पॉट' उमेदवारी जाहीर

Uddhav Thackeray MP Join Eknath Shinde Shivsena : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदारांनी अखेर एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेर सहाही खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
operation tiger; Uddhav Thackeray, Omraje Nimbalkar Joins Shivsena and Eknath Shinde
operation tiger; Uddhav Thackeray, Omraje Nimbalkar Joins Shivsena and Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदारांनी अखेर एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेर सहाही खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. धनुष्यबाण हाती घेताच एकनाथ शिंदेंनी सहाही खासदारांबाबत मोठी घोषणा केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहा खासदारांनी सोमवारी(ता.22) पक्षप्रवेश केला. यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे संजय देशमुख, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील,शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे,धाराशिवचे ओम राजेनिंबाळकर या धनुष्यबाण हाती घेतलेल्या खासदारांचा समावेश आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेल्या सहाही खासदारांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यापूर्वी मोठी घोषणा केली. त्यांनी 2029 च्या लोकसभा निवडणुकीत हेही सहाही खासदार शिवसेनेच्या तिकीटावर आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवतील असं जाहीर केलं आहे. एकप्रकारे शिंदेंनी या सहाही खासदारांची उमेदवारीच जाहीर केल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

उद्धव ठाकरेंच्या बंडखोर सहा खासदारांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या वतीन मुंबईत वाय.बी.सेंटर येथे पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी या बंडखोर सहाही खासदारांच्या वैयक्तिक तसेच मतदारसंघातील सर्व अडचणीच्या काळात ते आणि शिवसेना पक्ष भक्कमपणे पाठीशी उभा राहील याची ग्वाहीही त्यांनी दिली.

operation tiger; Uddhav Thackeray, Omraje Nimbalkar Joins Shivsena and Eknath Shinde
MLC Election : ठाकरेंना सोडण्याआधी ओम राजेनिंबाळकरांनी मोठा डाव टाकला होता; विधानपरिषदेच्या निकालनंतर सगळंच गणित समोर, किती मते फुटली?

तसेच एकनाथ शिंदेंनी सहा खासदारांच्या मतदारसंघातील रखडलेली विकासकामं मार्गी लावण्याचं आश्वासनही यावेळी दिलं. तसेच हे सर्व खासदारमंडळी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीतर, त्यांच्या मतदारसंघातील विकासा कामांसाठी शिवसेनेत आल्याचंही म्हटलं.

या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले,आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट करत नाही. त्यामुळे पक्षप्रवेश केलेल्या सर्व खासदारांनी कायद्याच्या चौकटीत, घटनेच्या चौकटीत, संसदीय चौकटीत ही प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे. संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे.त्यामुळे आमचं ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता बंडखोर खासदारांवर कारवाई होण्याची शक्यताही मावळली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com