Eknath Shinde Delhi visit : श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस? एकनाथ शिंदेंनी अधिवेशन सोडून गाठली दिल्ली

Maharashtra political News : मुंबई अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री अचानक दिल्लीत पोहोचले आहेत.
Eknath Shinde, Shrikant Shinde
Eknath Shinde, Shrikant Shindesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात महायुती एकत्रित निवडणुका लढणार की स्वबळ अजमावणार याची उत्सुकता लागली आहे. त्यातच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्रित आल्याने राज्यातील समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच मुंबई अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री अचानक दिल्लीत पोहोचले आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस प्राप्त झाल्याने एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवाल यांची भेट घेतल्याचे समजते.

राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच एकनाथ शिंदे बुधवारी रात्री अचानक दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती आहे. मात्र या दौऱ्याचे अधिकृत कारण अद्याप समजलेले नाही.

Eknath Shinde, Shrikant Shinde
Raj-Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरेंच्या आदेशाचे टायमिंग काळजाचा ठोका चुकवणारे! उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढणार!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. या नोटिसीमध्ये 2019 ते 2024 या काळात संपत्तीमध्ये झालेल्या वाढीबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. त्याचप्रमाणे संजय शिरसाट यांनाही उत्पन्न आणि मालमत्तेवरील वाढीबद्दल नोटीस मिळाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले असल्याचे समजते मात्र, या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे, या विधानावरून काही वेळातच संजय शिरसाट यांनी घुमजाव करीत विधान मागे घेतले आहे.

Eknath Shinde, Shrikant Shinde
Raj Thackeray silent game: राज ठाकरेंचा ‘सायलेंट गेम’ : युतीबाबतचे नेमके प्लॅनिंग काय? शिंदेंसोबत वेगळाच डाव खेळणार?

एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा दिल्ली दौरा नेमका कशासाठी आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र राज्यातील राजकीय घडामोडींवर शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. बुधवारी रात्री दिल्लीत दाखल झालेले एकनाथ शिंदे हे गुरुवारी दुपारपर्यंत दिल्लीतच होते. यावेळी शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व अजित डोवाल यांची भेट घेतल्याचे समजते.

Eknath Shinde, Shrikant Shinde
Chandrakant Khaire On Raj Thackeray : चंद्रकांत खैरे म्हणतात राज ठाकरेंची भूमिका योग्यच! उठसूठ युतीवर कोणीही बोलू नये..

दरम्यान, येत्या काळात जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक आणि आगामी निवडणुकीत युती झाल्यास याचा शिंदेंच्या शिवसेनेला (Shivsena) फटका बसण्याची शक्यता आहे. याशिवाय पक्षांतर्गत आमदार वेगवेगळ्या प्रकरणात टार्गेट केले जात आहेत. या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता या सर्व विषयांवर काय चर्चा केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde, Shrikant Shinde
BJP Political Strategy : जगातील सगळ्यात मोठा पक्ष 'भाजपला' 7 राज्यांचा घोळ काही केल्या सुटेना... मोदी-शाह-नड्डांनीही हात टेकले!

दरम्यान, अधिवेशन काळात एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असल्याने चर्चेला उधाण आले असताना शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी विकास कामाबाबत चर्चा करण्यासाठी ते गेले असतील असे सांगितले. तर नाना पाटोले यांनी शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे.

Eknath Shinde, Shrikant Shinde
BJP President Election : भाजप अध्यक्ष निवडीसाठी RSS ने सेट केलाय फॉर्म्यूला? हवाय असा धडाकेबाज नेता...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com