

Mumbai News: बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी नुकतीच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र,त्यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सातत्यानं ते विरोधकांना आव्हानं, धमक्या देतानाच नवनव्या वादांची तोंड फोडताना दिसून येत आहे. आजतर त्यांनी कहरच केला. थेट पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारुन टाकण्याची धमकीच दिली. यावर सर्वच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींकडून चौफेर टीका होत असतानाच उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शिवसेनेचे फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी गुरुवारी(ता.25) पत्रकारांशी गैरवर्तन करत धमकी दिल्यानंतर राज्याचं राजकारण वातावरण पेटलं आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी आपली संजय दिना पाटलांशी याबाबत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, या प्रकरणाची मी पूर्ण माहिती घेतो आणि नंतर सविस्तर प्रतिक्रिया देईन. पण माझं खासदार संजय दिना पाटलांशी माझी चर्चा झाली,बोलणं झालं. यावेळी त्यांनी माझ्याकडे भावनाही व्यक्त केल्या. पत्रकारांबद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी इच्छा नव्हती. पत्रकार आणि माझे संबंध चांगले राहिले आहेत.पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा कोणताही माझा हेतू नव्हता असं म्हणत शिंदे यांनी माध्यमांसमोर संजय दिना पाटलांची बाजू मांडली.
मात्र, दररोज जे कोणी त्यांच्या विरोधात बोलता,त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांबद्दल अपशब्द काढतात, हे अतिशय निंदनीय आहे. 2022 पासून आपण पाहता आहात. जी का भाषा वापरली जात आहे, मीडियासमोर येऊन बोलली जात आहे, ही काय महाराष्ट्राची भाषा आहे का, परत डोंट कटही म्हणायचं असा हल्लाबोलही शिंदेंनी यावेळी खासदार संजय राऊतांवर केला.
तसेच मीडियासमोर ते तोडून टाका, तुडवा, घरात घुसा आणि अत्यंत खालच्या दर्जाचे शब्द वापरतात, खरंतर हा मीडियाचाही अपमान आहे. त्याचाही राग कुठेतरी संजय दिना पाटलांच्या मनात असल्याचंही शिंदे यांनी यावेळी म्हटलं.
बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या मनात पत्रकारांबद्दल कोणताही राग नसल्याचं सांगितलं. त्यांचा पत्रकारांचा कोणताही अपमान करण्याचा हेतू नव्हता, जर पत्रकारांविषयी काही अवमानकारक शब्द जर गेले असतील तर संजय दिना पाटील हे दिलगिरी व्यक्त करतील, असंही शिंदे यांनी म्हटलं.
पत्रकारांच्याविषयी असं वक्तव्य आम्ही किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीनं करु नये. मी त्यांना सांगितलं आहे की, जर पत्रकारांविषयी काही अपमानकारक शब्द गेले असतील तर त्यांच्याशी बोलून दिलगिरी व्यक्त करावी. पत्रकार आणि लोकप्रतिनिधी रोज समोरासमोर असतो असंही शिंदेंनी म्हणत वेळ मारून नेली.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त करताना अरेरावीची भाषा वापरतानाच जीवे मारण्याची धमकीही दिली. तसेच “तुम्ही परत इकडे आलात, तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गांXXX घालताय, परत आले तर मारून. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा,” असे वक्तव्य संजय दिना पाटील यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.