Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांमुळे शिवसेनेतल्या 'या' नेत्यांची झाली गोची

Maharashtra Politics : तोंडावर पडूनही आक्रमक असलेल्या 'त्या' नेत्यांनीही घेतलं सबुरीनं
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : महराष्ट्रातील राजकारणात वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit) डॉ. प्रकाश आंबेडकर हे प्रयोगशील नेते आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. अलिकडे त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या काही वक्तव्यांमुळे राज्यातील दोन नेत्यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले होते.

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar : पंतप्रधान मोदी तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत : आंबेडकरांनी प्रमाणपत्र का दिलं?

वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यांनी राज्यात धुराळा उडवून दिला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे भाजपचेच असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले होते. तसेच मी माझ्या पक्षाचा मालक आहे. भविष्यात वंचित भाजपसोबतही जाईल. तसे करण्यास मला कोणीही रोखू शकत नाही. त्यांच्या या विधानांमुळे राजयकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी भुवया उंचवलेल्या आहेत.

Prakash Ambedkar
Bageshwar Maharaj : ‘अंनिस’ने आव्हान दिलेले बागेश्‍वर महाराज आहेत तरी कोण ?

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांची वंचित आणि शिवसनेची युतीची घोषणा २३ जानेवारी रोजी करण्यात आली. त्यावेळी वंचितने शिवसेनेबरोबर युती केली असून महाविकास आघाडीशी (MVA) काही संबंध नसल्याचेही आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीत असलेलेल काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती.

Prakash Ambedkar
Amit Shaha News : अमित शाह दक्षिण दिग्विजयावर : काँग्रेस शह देणार का?

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी यापूर्वी अंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि आता शिवसेना (ठाकरे)चे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ओळखत नसल्याचे म्हणाले. त्यांच्या विधानामुळे अंधारे आणि राऊत यांची चांगलीच गोची झाली होती. मात्र त्या नेत्यांनीही सबुरीने घेत आंबेडकर यांना उत्तर दिलेले आहे.

शिवशक्ती-भीमशक्तीचा फॉर्म्युला अंमलात आणण्यासाठी शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला सुषमा अंधारे यांचा चेहरा महत्त्वाचा वाटतो. मात्र दोन महिन्यांपूर्वी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची मिमीक्री केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते.

त्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले होत की, "कोण या सुषमा अंधारे? यांना मी ओळखत नाही. तसेच कुठेही चळवळीच्या ठिकाणी त्यांच्याशी भेट झाली नाही. त्या कोण आहेत बघायला पाहिजे." त्यावेळी अंधारे यांनीही प्रतुत्यरही दिले होते.

Prakash Ambedkar
Shivsena News : ठाकरे-वंचित युतीत पहिली ठिणगी : 'कोण संजय राऊत?' म्हणत आंबेडकरांनी फटकारले..

आता युती झाल्यानंतर अंधारे यांना विचारले असता त्यांनीही सांगितले, "भिमशक्ती-शिवशक्ती युती झाली ते चांगली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारची टीका केलेली नव्हती. त्यांनी फक्त ओळख नसल्याचं म्हटलं होतं. त्यांचे आणि माझे विचार एकच आहेत. आता आंबेडकर यांना भेटेल. त्यांच्याशी ओळख वाढवेल'', असं म्हणत त्यांनी वादावर पडदा टाकला.

मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाशी युती केल्यानंतर वंचितचे (vanchit) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे विरोधक सोडून महाविकास आघाडीतील (MVA) राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच अडचणीत आणताना दिसत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार भाजपचेच असल्याचे म्हटले. तसेच त्या विधानावर ठाम असल्याचेही सांगितले.

यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. तसेच वंचितचा आणि महाविकास आघाडीचा काही संबंध नसल्याचेही म्हणाले.

Prakash Ambedkar
Ambegaon News : थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही जुमानेनात!

यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आंबेडकर यांना सदस्य पक्षांबाबत सांभाळून बोलण्याच सल्ला दिला होता. राऊत म्हणाले, 'काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी अशी वक्तव्यं करणं योग्य नाही. शरद पवार (Sharad Pawar) हे देशातील उत्तुंग नेते आहेत. आंबेडकर यांनी पवार यांच्याबद्दल आदर ठेऊन बोलले पाहिजे'.

राऊत यांच्या या विनंतीवजा सल्ल्याचा प्रकाश आंबेडकर यांनी चांगलाच समचार घेतला. त्या सल्ल्याला धुडकावून लावत संजय राऊत यांच्या ठाकरे गटातील अधिकारांविषयीच शंका उपस्थित केली. या प्रकारामुळे संजय राऊत हेही चक्रावले असतील. आंबेडकर म्हणाले, 'मला हा सल्ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला असता, तर तो मी मानला असता. पण, कोण संजय राऊत कोण? आम्हाला सल्ला देणारे राऊत कोण आहेत? असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना डिवचले आहे. यावर संजय राऊत यांनीही समजुतीने घेत हा विषय वाढविणं टाळलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com