

Mumbai. 01 February : ज्येष्ठ नेते शरद पवार हे 2014 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) आले असते, तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली नसती आणि कदाचित शरद पवार हे या देशाचे राष्ट्रपती झाले असते, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
दिल्लीत माध्यमांशी बोलताना मंत्री आठवले यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत भाष्य केले. त्या वेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रपतीपदाबाबत विधान केले आहे.
ते म्हणाले, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टीकोनातून देश आणि राज्य पुढे जात आहे. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे समाजवादी नेते ‘एनडीए’मध्ये होते, त्यामुळे शरद पवार यांच्यासारखा नेत्याने ‘एनडीए’मध्ये येणं आवश्यक आहे. मी त्यांना ‘एनडीए’मध्ये येण्याचे अनेकदा आवाहन केले होते.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा शरद पवारांचा आदर केला आहे. त्यांनी बारामतीत जाऊन शरद पवार हे माझे नेते आहेत, असं म्हटलं होतं. त्यामुळे देशाच्या विकासासाठी पवारांनी आपल्या निर्णयात बदल करणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही.
अजितदादा पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोघे एकत्र येतील, अशी चर्चा त्यावेळीही होती. पण अडचण अशी आहे की, शरद पवार हे भाजप, एनडीएसोबत यायला तयार नाहीत. जर पवारसाहेबांनी भूमिका बदलली तरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.