Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा मुहूर्त ठरला; सुनेत्रा पवारांच्या नावाचा पहिला ठराव पुण्यातून

NCP National President : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा पहिला ठराव पुण्यातून एकमताने मंजूर झाला असून अध्यक्ष निवड प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे.
Sunetra Pawar during a party meeting as Pune NCP corporators pass unanimous resolution proposing her name for National President of the Nationalist Congress Party.
Sunetra Pawar during a party meeting as Pune NCP corporators pass unanimous resolution proposing her name for National President of the Nationalist Congress Party.Sarkarnama
Published on
Updated on

NCP National President : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या घटनेतील संबंधित तरतुदींनुसार राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झाल्यास, पक्षाच्या अधिकृत यंत्रणेला योग्य ठरावाद्वारे नवीन अध्यक्ष निवडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार, सुनेत्रा पवार यांची या पदावर निवड करावी असा पहिला ठराव पुण्यातून संमत करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करावी, असा ठराव करण्यात आला. हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठविला आहे. अध्यक्षपदासाठी यापूर्वी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नावे पुढे आल्याने जोरदार चर्चा सुरू होती.

Sunetra Pawar during a party meeting as Pune NCP corporators pass unanimous resolution proposing her name for National President of the Nationalist Congress Party.
Sunetra Pawar : पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पुणे DPC ची पहिलीच बैठक : CM फडणवीस दुपारी लगेचच करणार शिक्कामोर्तब

महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते ॲड. नीलेश निकम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी महापालिकेत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी, असा ठराव ॲड. निकम यांनी मांडला.

Sunetra Pawar during a party meeting as Pune NCP corporators pass unanimous resolution proposing her name for National President of the Nationalist Congress Party.
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर, अमित शहा, नरेंद्र मोदींना भेटणार; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा?

हा ठराव एकमताने मान्य करण्यात आला. माजी महापौर व नगरसेविका वैशाली बनकर यांनी ठरावास अनुमोदन दिले. या ठरावावर 23 नगरसेवकांनी स्वाक्षरी केली, तर दोन नगरसेवक न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनुपस्थित होते. हा ठराव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे पाठवण्याची शिफारस करण्यात आली, अशी माहिती निकम यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com