Rajya Sabha resignation : सुनेत्रा पवारांचा खासदारकीचा राजीनामा : दोन वर्षांच्या शिल्लक टर्मसाठी राष्ट्रवादीतील मंत्र्यांच्या नावाची चर्चा

Maharashtra politics News : बुधवारी दुपारनंतर त्यांनी दिल्लीला जाऊन उपराष्ट्र्पती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या खासदारकीची मुदत अजून दोन वर्ष शिल्लक आहे.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी तीन महिन्यापूर्वी सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर बारामती विधानसभा मतदार संघात मोठा विजय सुनेत्रा पवार यांनी सोमवारी झालेल्या निवडणुकीत मिळवला. त्यामुळे त्यांना कोणत्यातरी एका पदाचा राजीनामा द्यावा लागणार होता.

बुधवारी दुपारनंतर त्यांनी दिल्लीला जाऊन उपराष्ट्र्पती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सादर केला आहे. त्यांच्या खासदारकीची मुदत अजून दोन वर्ष शिल्लक आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ज्येष्ठ मंत्र्यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु असून याठिकाणी त्यांची वर्णी लागणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

बुधवारी दुपारनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या दिल्ली दौऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी त्यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यासोबतच त्यांच्या खासदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सादर केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. आता त्या विधानसभेच्या सदस्य बनल्या असल्याने त्यांना राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे

Sunetra Pawar
Maharashtra Din News: मोठी बातमी: पुण्यात महाराष्ट्र दिनाला पालकमंत्री सुनेत्रा पवार नाही, तर भाजपच्या महिला नेत्या झेंडावंदनाचा मान

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त होणाऱ्या राज्यसभा जागेवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, त्यातच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव चर्चेत आहे. पवार यांच्या खासदारकीची टर्म अद्याप दोन वर्षाची शिल्लक राहणार आहे. त्यामुळे या खासदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. त्यामुळे आता याठिकाणी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता कायम आहे.

Sunetra Pawar
NCP Politics : बारामतीचे मतदान उरकताच सुनेत्रा पवारांनी दोन्ही लेकांवर टाकली मोठी जबाबदारी; जय पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?

खासदारकीसाठी राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांच्यासह माजी खासदार आनंद परांजपे यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. त्यामुळे आता आगामी काळात होत असलेल्या या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Sunetra Pawar
Maharashtra Politics: मोठी बातमी: फडणवीस शिंदेंऐवजी सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार असेल,तर...; उद्धव ठाकरेंच्या नेत्याचं खळबळजनक विधान

एका सभागृहाचा राजीनामा 14 दिवसांच्या आत देणे बंधनकारक

दरम्यान, सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या असल्याने त्यांनी आपला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नियमानुसार दोन्ही सभागृहात निवडून आलेल्या व्यक्तीला एका सभागृहाचा राजीनामा 14 दिवसांच्या आत देणं बंधनकारक असते. त्यामुळेच, आमदारकीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, त्यांची आपला खासदारकीचा राजीनामा दिला. आता, लवकरच सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होणार आहे.

Sunetra Pawar
Maharashtra Din News: मोठी बातमी: पुण्यात महाराष्ट्र दिनाला पालकमंत्री सुनेत्रा पवार नाही, तर भाजपच्या महिला नेत्या झेंडावंदनाचा मान
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com