

Pune News: एकीकडे महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड वेगवान राजकीय घडामोडींना घडताना दिसून येत आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्या जात आहेत. आता याचदरम्यान, एक पुण्यातून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
राज्य सरकारकडून महाराष्ट्र दिन झेंडावंदन कार्यक्रमात निमित्त काही महत्त्वाचे आदेश काढण्यात आले आहेत. पण पुण्यातील झेंडावंदनाच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आहेत. त्यांना झेंडावंदनाचा मान दिला जातो. पण यावेळी त्यांच्याऐवजी राज्यमंत्री माधुरी मिसाळ या झेंडावंदन करणार आहे.
बारामती आणि अहिल्यानगरच्या राहुरी या दोन मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांचा निकाल येत्या 4 मे रोजी लागणार आहे. बारामती पोटनिवडणुकीत पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार स्वत:उमेदवार असल्यानं त्यांना झेंडावंदन करता येणार नाही.त्याच धर्तीवर सरकारनं हे आदेश काढले आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्त सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड येथे झेंडावंदन कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच मंत्री बाबासाहेब पाटील अमरावती, मंत्री माधुरी मिसाळ पुणे आणि मंत्री योगेश कदम भंडारा येथे झेंडावंदन करणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतची माहिती बुधवारी(ता.29) देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुण्याचे नवीन पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर 3 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या बैठकांनाही हजेरी लावली होती. त्या पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय आणि विकासकामांचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. बारामतीत अजित पवारांच्या पत्नी आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मैदानात आहेत. तर राहुरीच्या जागेवर शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणूक रिंगणात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.