NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा घडामोडी घडत असून प्रफुल पटेल यांना कार्याध्यक्षपदावरून हटवल्याची चर्चा आहे. पक्षाकडून निवडणूक आयोगाला जे पत्र दिले आहे. त्या पत्रामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावापुढे अध्यक्ष म्हणून उल्लेख आहे. मात्र, प्रफुल पटेल यांच्या नावापुढे कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख नाही. त्यामुळे पटेल यांना पदावरून हटवल्याच्या चर्चा आहेत.
'साम टिव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात केवळ सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव गर्जे यांच्याच नावा पुढे पदाचा उल्लेख आहे. मात्र, इतर कोणाच्याही नावापुढे पदाचा उल्लेख नाही.
या पूर्वी निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसने जे आपले संविधान दिले होते. त्यामुळे प्रफुल पटेल यांचा उल्लेख कार्याध्यक्ष म्हणून होता. त्यांना पक्षाचे खजिनदार, सरचिटणीस नेमण्याच्या अधिकार देण्यात आले होते.
त्यानंतर पक्षात अंतर्गत नाराजी व्यक्त केली जात होती. पक्षात दोन गट पडल्याची देखील चर्चा होती. त्यात आता राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पटेलांच्या कार्याध्यक्षपदाचा उल्लेख नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
जय पवार हे राजकारणपासून दूर होते. मात्र, अजित पवारांच्या निधनामुळे ते राजकारणात सक्रीय होतील, अशी शक्यता होती. अखेरी पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जय पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यसभेत पक्षाची बाजु मांडताना पार्थ पवार दिसतील तर पक्षातील संघटनात्मक जबाबदारी जय पवार पार पडतील, असे या नियुक्तीवरून दिसत आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीमध्ये तरुण नेत्यांना संधी देण्यात आली आहे. जय पवार यांच्यासोबतच सरोज अहिरे, शेखर निकम, चेतन तुपे, सना मलिक यांना तरुण नेत्यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आली आहे. त्यामुळे या यंग ब्रिगेडसोबत सुनेत्रा पवार पक्षाची बांधणी नव्याने करतील, अशी असे चित्र दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.