Sunetra Pawar Politics : राष्ट्रवादी सोडणाऱ्या बड्या नेत्याला सुनेत्रा पवारांचा दणका, थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

Sunetra Pawar Anand Paranjpe : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या आनंद परांजपे यांना सुनेत्रा पवारांनी मोठा झटका दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी पत्र दिले आहे.
Sunetra Pawar
Sunetra Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar News : विधान परिषदेला संधी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली होती. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आपला डीएनए शिवसेनेचा असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोठं पाऊल उचललं आहे.

आनंद परांजपे यांची महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाव देण्यात आले होते. मात्र, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून परांजपे यांना पक्षाच्या कोट्यातून महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्षपद देऊ नये, अशी मागणी केली आहे.

पक्षाकडून लवकरच नवे नाव सुचवले जाईल, असे देखील त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे परांजपे यांची उपाध्यक्षपद हुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आली होती. या जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये मोठी स्पर्धा होती. आनंद परांजपे हे देखील या जागेसाठी इच्छुक होते. मात्र, राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर परांजपे यांनी वैयक्तिक कारण सांगत राष्ट्रवादीतून आपल्या पदांचा राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

Sunetra Pawar
MLC Election : विधानपरिषद की मुलांचे राजकीय पुनर्वसन केंद्र, पुत्रप्रेम उफाळल्याने कार्यकर्ते उपेक्षित?

स्थानिकसाठी तीन जागांची मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधान परिषदेसाठी 17 आमदारांची नियुक्ती होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन जागांची मागणी करण्यात आली आहे. जेथे आमची संख्या जास्त आहे त्या जागांची मागणी आम्ही केली आहे, याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले आहे.

Sunetra Pawar
Sachin Jagtap MLC Election : प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर? ससाणे-जगताप-भोसले यांनी नेले अर्ज, अहिल्यानगरच्या राजकारणात पुढील 48 तास निर्णायक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com