Sushma Andhare : 'तुझ्या डोक्यावर टोपी, माझ्या डोक्यावर...', शहांच्या 'त्या' कौतुकामागे मोठा गेम प्लॅन? ठाकरेंच्या नेत्याचा दावा!

Sushma Andhare Targets Amit Shah : सुषमा अंधारे म्हणाल्या, "कोल्हापूर मध्ये अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंवर भरमसाठ स्तुतीसुमन उधळली. याच करणं त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे. कारण शहांना पंतप्रधान पदावर बसण्याची घाई लागलेली आहे.
Amit Shah, Eknath Shinde
Amit Shah, Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज महाराष्ट्राच्या दौरावर होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी कोल्हापूरमधील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यादेखील उपस्थित होत्या.

कार्यक्रमादरम्यान अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या केलेल्या कौतुकाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. याच कौतुकावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, "कोल्हापूर मध्ये अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंवर भरमसाठ स्तुतीसुमन उधळली. याच करणं त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे. कारण शहांना पंतप्रधान पदावर बसण्याची घाई लागलेली आहे.मात्र त्यांच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा अडथळा आता योगी आदित्यनाथ नाहीत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अडवण्यासाठी त्यांना एक स्पीड ब्रेकर हवा आहे. एकनाथ शिंदे ते काम करत आहेत.

Amit Shah, Eknath Shinde
KDMC Politics : महायुतीत वाद! शिंदेंच्या आमदार अन् भाजपच्या स्थायी अध्यक्षामध्ये जुंपली; 'क्रेडिट वॉर' भडकले!

त्यामुळे एकनाथ शिंदेंना सुखावणे त्यांचे कौतुक ही अमित शहांची गरज आहे. अगदी त्याच पद्धतीने अमित शहांची भलामण करून किंवा अमित शहांच्या साठी सगळा रस्ता खुला करून देणं ही एकनाथ शिंदेंची गरज आहे. याचाच अर्थ तुझे डोक्यावर टोपी माझ्या डोक्यावर टोपी तुझी तशी स्थिर माझी फिरवायला सोपी या न्यायाने दोघांचेही मस्त चालले." असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

Amit Shah, Eknath Shinde
ACP Harassment Case : पुण्यात धक्कादायक प्रकार: निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताकडून सुनेचा छळ व शरीरसुखाची मागणी; 7 जणांवर गुन्हा दाखल 'मी एसीपी होतो...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com