Prashant Bedse : कोरोनात मास्क न घातल्याने तहसीलदाराचे निलंबन, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश

Prashant Bedse Suspension Revoked : डिसेंबर 2022 मध्ये मास्क न घातल्याचा फोटो प्रसिद्ध झाल्याने तहसिलदार प्रशांत बेडसे यांचे जुलै 2024 मध्ये निलंबन करण्यात आले होते.
Prashant Bedse
Prashant Bedsesarkarnama
Published on: 
Updated on: 

Prashant Bedse News: कोरोना काळात मास्क न घातल्याचा ठपका ठेवत खेडचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निलंबीत करण्यातआले होते. कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन करणे तसेच नागरिकांशी सौजन्याने न वागणे असा ठपका बेडसे यांच्यावर ठेवण्यात आला होता.

निलंबन कालावधीत बेडसे यांनी खासगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा अथवा व्यापार करू नये. तसे केल्यास निर्वाह भत्ता मिळणार नसल्याचे शासनाने निलंबणाची कारवाई करताना म्हटले होते. कारवाईच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती.

Prashant Bedse
Aaditya Thackeray News : वर्षभराने तुरुंगातून सुटलेल्या ‘भाऊ’ला आदित्य ठाकरेंची कडकडून मिठी; डोळेही भरून आले...

डिसेंबर 2022 मध्ये मास्क न घातल्याचा फोटो प्रसिद्ध झाल्याने तहसिलदार बेडसे याचे जुलै 2024 मध्ये निलंबन करण्यात आले होते. ⁠कोव्हिड गाईडलाईनचं उल्लंघन केल्याचा ठपका बेडसे यांच्यावर ठेवण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने हा ठपका हास्यास्पद असल्याचे सांगत बेडसे यांचे निलंबन रद्द करत त्यांना दिलासा दिला. निलंबनाच्या अजब कारणावर बोट ठेवत न्यायालयाने सरकारला फटकारले.

बेडसे हे सोलापूरमधील मोहोळ येथे तहसीलदार पदावर असताना कोविड नियमाचे उल्लंघन करणे, वकिलांना, सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे आदी तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर बेडसे यांची विभागीय चौकशी सुरू होती. तब्बल दोन वर्षानंतर बेडसे यांना निलंबीत करण्यात आले होते. न्यायालयाने बेडसे यांचे निलंबन रद्द केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Prashant Bedse
Arvind Kejriwal News : केजरीवालांनी दिल्लीत आम आदमी पार्टीला मिळणाऱ्या जागांचा थेट आकडाच सांगितला अन् म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.