Thackeray brothers protest : तिसऱ्या ठाकरे पुत्राचीही राजकारणात ग्रँड एंट्री : थेट ‘झेन जी’च्या आंदोलनातून लॉंचिंग; पहिल्याच मुव्हमेंटने उंचावल्या अनेकांच्या भुवया

Thackeray brothers at Shivaji Park protest News : आदित्य ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. त्यामुळे मुंबईत देखील सीजेपीच्या आंदोलनाला ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आंदोलनाला धार आली होती.
tejas, uddhav, aditya thackeray
tejas, uddhav, aditya thackeray Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. गेल्या दहा दिवसापासून विरोधी पक्षाकडून दिल्ली, मुंबईत आंदोलन केले जात आहे. त्यामध्ये इंडिया आघाडीसह सीजेपी व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सहभागी होत केंद्र सरकारच्या विरोधात रान पेटवले आहे. त्यातच मुंबईत रविवारी शिवाजी पार्क परिसरात झालेल्या आंदोलनात तिसऱ्या ठाकरे पुत्राचीही राजकारणात ग्रँड एंट्री झाल्याचे पाहवयास मिळाले. रविवारी झालेल्या आंदोलनात शिवसेना भवन परिसरात आदित्य आणि अमित ठाकरे भूमिका मांडत असताना, भावांच्या खांद्याला खांदा लावून पोलिसांची गाडी अडवून धरणारे तेजस ठाकरे हे पाहायला मिळाले.

याआधीही अनेक वेळा तेजस ठाकरे यांच्या राजकीय कार्यक्रमांच्या उपस्थितीने तेजस ठाकरे राजकारणात येणार? अशा चर्चा रंगल्या होत्या. अशातच रविवारी पोलिसांच्या गाडीसमोर उभे राहिल्याने पुन्हा या चर्चांना उधाण आले आहे. थेट ‘झेन जी’च्या आंदोलनातून तेजसचे लॉंचिंग झाले अन् पहिल्याच मुव्हमेंटने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दिल्लीत शनिवारपासून सीजेपीने आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शनिवारी दिल्लीत अभिजित दिपके, सौरव रांका व ध्रुव राठी यांना ताब्यात घेतल्याने आंदोलन तीव्र करण्यात आले. मुंबईत देखील शिवसेना (Shivsena) व मनसेने आक्रमकपणे आंदोलन केले. एवढेच नव्हे तर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना ताब्यात घेतले होते. त्यांना सोडण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. त्यामुळे मुंबईत देखील सीजेपीच्या आंदोलनाला ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आंदोलनाला धार आली होती.

त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 11 ऑक्टोबरला मुंबईतील शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड केली. या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या (Uddhva Thackeray) शिवसेनेचे कार्यकर्ते व राज ठाकरे यांच्या मनसेचे नेते आक्रमक झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरेही सेना भवन परिसरात दाखल झाले. आंदोलनकर्त्यांच्या सुटकेसाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात तेजस ठाकरे सहभागी झाले. या घडामोडींमुळे ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य सक्रिय राजकीय भूमिकेत दिसू लागला आहे.

tejas, uddhav, aditya thackeray
Congress News : काँग्रेसला दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांचा 'तो' आदेश रद्द, राजापूरच्या नगरसेविकेचे पद कायम

ठाकरे कुटुंबातील आणखी एक चेहरा राजकारणाच्या मैदानात उतरणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, यानिमित्ताने तेजस ठाकरे यांची रविवारी झालेल्या आंदोलनातील उपस्थिती लक्षणीय ठरली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी झालेल्या ठिय्या आंदोलनात आदित्य ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरे हिरारीने सहभागी झाले. त्यामुळे आतापर्यंत राजकारणापासून काहीसे दूर राहिलेले तेजस ठाकरे आता सक्रिय राजकारणात असल्याच्या चर्चा रंगली आहे.

tejas, uddhav, aditya thackeray
KDMC Politics : "आमचा आवाज दाबाल तर...", केडीएमसी महासभेत नगरसेवकांचा प्रचंड गोंधळ; शिवसेना-भाजप आमनेसामने

शिवसेना भवन परिसरात रविवारी झालेल्या आंदोलनात आदित्य आणि अमित ठाकरे भूमिका मांडत असताना यावेळी तेजस यांनी केवळ सहभाग नोंदवला नाही तर भावांच्या खांद्याला खांदा लावून पोलिसांची गाडी तेजसने अडवली. आदित्य व अमित ठाकरे हे दोघेजण पोलिसांच्या गाडीवर चढून घोषणा देत होते तर दुसरीकडे तेजसने ही पोलिसांची गाडी अडवली होती. त्यामुळे त्यांच्या पहिल्या आंदोलनातूनच तेजस ठाकरे यांचे नाव चर्चेत आले आहे. तेजसचे थेट ‘झेन जी’च्या आंदोलनातून लॉंचिंग झाले अन् पहिल्याच मुव्हमेंटने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे बंधू असलेले तेजस ठाकरे हे प्रामुख्याने वन्यजीव संशोधन आणि जैवविविधतेशी संबंधित कामासाठी ओळखले जातात. आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थी राजकारणापासून निवडणुकीच्या राजकारणापर्यंत सक्रिय भूमिका घेतली. मात्र, तेजस ठाकरे यांची सार्वजनिक प्रतिमा तुलनेने राजकारणापासून दूर राहिलेल्या व्यक्तीची राहिली होती. मात्र, रविवारी संधी मिळताच तेजस ठाकरे सक्रिय झाले आहेत.

त्यानंतर सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी शिवाजी पार्क परिसरात उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसेने आक्रमकपणे आंदोलन केले. या आंदोलनात देखील तेजस बंधू आदित्यच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. त्यामुळे आता येत्या काळात सर्वच कार्यक्रमात आता आदित्य ठाकरे यांच्या बरोबरीने तेजस ठाकरे यांचा वावर असणार आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंबच सोमवारच्या आंदोलनात सहभागी झाले होते. राज ठाकरे यांच्या सोबतच पत्नी शर्मिला ठाकरे व अमित ठाकरे रस्त्यावर उतरले होते.

tejas, uddhav, aditya thackeray
Congress Politics : काँग्रेसकडून कारवाईचा दंडुका सुरूच, महिला जिल्हाध्यक्षाची पक्षातून हकालपट्टी, थेट निलंबन...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com