Thackeray brothers alliance : ठाकरे बंधूंची युती जाहीर, आता महाविकास आघाडीचं काय? उद्धव ठाकरेंनी एकाच वाक्यात सांगितलं अन् सगळे हसले

Raj-Uddhav Thackeray News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी बहुचर्चित असलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीची घोषणा बुधवारी दुपारी अधिकृतरित्या करण्यात आली.
Raj Thackeray And Uddhav Thackeray
Raj Thackeray And Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी बहुचर्चित असलेली उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीची घोषणा बुधवारी दुपारी अधिकृतरित्या करण्यात आली. ठाकरे बंधूंची घोषणा होताच सत्तधारी व विरोधकांकडून विविध प्रश्नांचा भडीमार केला जात असतानाच यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आता महाविकास आघाडीचे काय? होणार असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रकाराने विचारले असता त्यांनी या प्रश्नाचे उत्तर केवळ एकाच वाक्यात सांगितले अन् पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले सगळे हसले.

गेल्या पाच महिन्यापासून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या उद्धव व राज ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्धार केला होता. गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेचे जागावाटपाबाबत बोलणे सुरु होते. ही जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्प्यात आल्यानंतर युतीची अधिकृतरित्या घोषणा बुधवारी राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत केली.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
BJP leader Marriage : 'वयाचं बंधन तोडलं!' 63 व्या वर्षी भाजप नेत्याचं चौथं लग्न; 20 वर्ष लहान काँग्रेस नेत्याशी बांधली लग्नगाठ, नेटकरी थक्क!

वरळीच्या ब्लू सी हॉटेलमधून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी युती झाल्याचे मी घोषित करतो, असे जाहीर केले. या पत्रकार परिषदेला ठाकरे कुटुंबातील सर्व महत्वाचे सदस्य उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठकारे, पुत्र आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्याशिवाय राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, बहिण, मुलगा अमित ठाकरे उपस्थित होते. दोन्ही पक्षांचे महत्वाचे नेते किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे हजर होते.यावेळी मनसे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
Shivsena UBT : ठाकरेंचा कोकणातील दुसराही नगराध्यक्ष फुटला? 'मातोश्री'वर न जाता थेट शिंदेंनाच भेटला, शिवसेनेत खळबळ

यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रकाराने आता महाविकास आघाडीचे काय होणार? असा प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नाचे उत्तर 'सगळे पक्ष बाहेर पडले असले तरी, आघाडी अबाधित आहे,' असे केवळ एकाच वाक्यात सांगितले अन् पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले सगळेजण हसले.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
NCP Ajit Pawar Sharad Pawar Alliance : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, पवारांचा शिलेदार म्हणतो, छे.. छे..! आमचं, 'मविआ'चं जुळलंय? आता महायुतीची खैर नाही!

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, आमचे विचार एक आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आलो असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
Raj Thackeray-Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकत्र येणार, शिंदेच्या शिलेदारानं धाडल्या शुभेच्छा; म्हणाले, "त्यांनी आनंदानं अन्..."

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आज आम्ही आमचे कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत, आणि मी मागेच मी सांगितलं एकत्र येतोय ते एकत्र राहण्यासाठी, यापुढे मुंबई आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राल मुंबईपासून, मुंबईपासून मराठी माणसाला तोडण्याचा प्रयत्न करेन त्याचा राजकीय खात्मा करू अशी शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे जो एक अपप्रचार केला होता बटेंगे तो कटेंगे तसं आज मी मराठी माणसाला सांगतोय की, आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाईल, म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र देतो आहे आणि मला खात्री आहे. त्यासोबतच शरद पवार यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. ही महाराष्ट्र प्रेमीची युती आहे, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक घडामोड : ठाकरे बंधूंकडून युतीची अधिकृत घोषणा, मुंबईचा महापौरही ठरवला!

राज ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे मी जाहीर करतो, असे राज ठाकरे म्हणाले. कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोण किती जागा लढवणार , हे आता सांगणार नाही. दोन टोळ्या वाढल्या आहेत, जे राजकीय पक्षातील मुले पळवतात. राज्यात सध्या दोन लहान मुले पळवण्याची टोळी आहे, अशी टीका राज ठाकरेंनी यावेळी केली.

Raj Thackeray And Uddhav Thackeray
BJP leader Marriage : 'वयाचं बंधन तोडलं!' 63 व्या वर्षी भाजप नेत्याचं चौथं लग्न; 20 वर्ष लहान काँग्रेस नेत्याशी बांधली लग्नगाठ, नेटकरी थक्क!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com