मोठी बातमी: उद्धव ठाकरेंनी अखेर हुकमी पत्ता काढला बाहेर,स्वतःच्या आमदारकीचा त्याग,शिवसेनेच्या लढवय्या नेत्याला दिली संधी

Political News : राज्यात नऊ जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस असताना राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नऊ जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस असताना राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्र्रवादी काँग्रेसने धरला होता. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी डाव टाकला असून ऑगस्ट महिन्यातच निवृत्त झालेल्या विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेची निवडणूक लढविण्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकार दर्शवित बुधवारी दुपारी अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आता महाविकास आघाडीतील घडामोडीकडे लागले आहे. उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याची घोषणा काँग्रेस नेत्याने केली होती. त्यामुळे आता काँग्रेस (Congress) नेते काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
Baramati Election: बारामतीची पोटनिवडणूक होणार हायव्होल्टेज! बिनविरोध म्हणता म्हणता आलेत तब्बल 'इतके' अर्ज

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे (ambadas Danve) गुरुवारी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची समजते. त्यामुळे आता राज्यात एकंदरीतच वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.

Uddhav Thackeray
Baramati by election : पायाखालची वाळू सरकली अन् फडणवीसांचा फोन! बारामतीत काँग्रेसची माघार का? सपकाळांनी उघड केले रहस्य

महाविकास आघाडीतील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जागा रिक्त होत असल्याने ही जागा त्यांनीच लढावी असा आग्रह काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे निवडणूक लढविण्याबाबत सुरुवातीपासून ठाम नव्हते. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम होता. त्यामुळेच या एका जागेसाठी मित्रपक्षांचा दबाव वाढला असल्यामुळे महाविकास आघाडीत 'हायव्होल्टेज ड्रामा' पाहवयास मिळत होता. मात्र आता उमेदवारी जाहीर करून ठाकरेंनी बाजी मारली आहे.

Uddhav Thackeray
Chandrakant Patil : "अशा परिस्थितीत भविष्यात काही मागायचे असते काही शब्द घ्यायचे असतात"; बारामतीच्या निवडणुकीवर चंद्रकांत पाटलांचं भाष्य

दरम्यान, विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी मोठी रस्सीखेच दिसत आहे. महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरु आहे. मात्र, कोणत्याच विषयवार एकमत होत नाही. काही दिवसापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरेंची भेट घेत पुन्हा निवडणूक लढविण्याची त्यांनी विनंती केली. तर दुसरीकडे तुम्ही निवडणूक लढणार नसाल तर काँग्रेसला जागा सोडण्याची मागणी केली होती. त्यासोबतच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, अशी विनंती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर केली.

Uddhav Thackeray
Baramati By Election: बारामती पोटनिवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट, काँग्रेसच्या नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ; 'भाजपनं आमच्याशी संपर्क...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com