Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकासोबतच्या बैठकीत केला पत्ता ओपन; म्हणाले, 'मनसेसोबतच्या युतीचा निर्णय...'

Shiv Sena meeting News : एमएमआर रिजनमधील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी प्रमुख नेत्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मोठे आदेश दिले आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाची लगबग सुरु आहे. निवडणुका तोंडावर आल्या असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून रणनीती आखली जात आहे. त्यासाठी सध्या मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरु आहे. एमएमआर रिजनमधील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी प्रमुख नेत्यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मोठे आदेश दिले आहेत. त्यासोबतच मनसेसोबतच्या युतीबाबत मोठे विधान केले.

हिंदी सक्तीच्या विरोधात राज-उद्धव ठाकरे हे बंधू एकवटले आहेत. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) या दोन पक्षांची युती होणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या ऑक्टोबरच्या अखेरीस महापालिका निवडणुकीचे आदेश जारी होण्याची शक्यता असून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.

Uddhav Thackeray
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! 'या' धडाकेबाज महिला नेत्यावर सोपवली जबाबदारी

मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जिल्हाप्रमुख त्यासोबतच महत्त्वाचे पदाधिकारी यांच्यासोबत ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर , भिवंडी, वसई विरार या 7 महापालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. ज्याठिकाणी गटप्रमुखांच्या नेमणुका झालेल्या नाहीत तिथे गटप्रमुखांच्या नेमणुका करा, महापालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक तयारी करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्या.

Uddhav Thackeray
Nandurbar Local Body Election 2025: भाजप आमदारांमध्ये मतभेद! महायुती की स्वबळावर; 'स्थानिक' निवडणुकीवरुन जुंपली

सगळ्या जागांसाठी तयारीला लागा

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करायची की नाही? याचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मनसेसोबतच्या युतीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, त्याबद्दलची माहिती देखील सर्वाना दिली जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
Raju Shetti News: राजू शेट्टींना वेगळाच संशय; म्हणाले, कोकाटेंकडे अजितदादा अन् फडणवीसांबाबत गुपित...

निवडणुकीची घोषणा लवकरच होणार असल्याने आतापासूनच कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. त्यासोबतच कोर्टाच्या निर्णयानुसार नवीन प्रभाग रचनेनुसार ज्या निवडणुका होणार आहेत त्यावर विशेष लक्ष ठेवा, ज्या गोष्टी घडत आहेत त्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Uddhav Thackeray
BJP And Shiv Sena Alliance Trouble : उद्धव-राज युती; भाजपचं गणित फिस्कटतंय, तर शिंदे शिवसेनेसाठी धोका!

दरम्यान, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने पालिका निवडणुकीत बहुमत प्राप्त करू असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नाशिकमध्ये बहुमत प्राप्त करू, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. एकाअर्थी राऊत यांनी दोन्ही भाऊ एकत्र येत असल्याचे सुतोवाच केला आहे.

Uddhav Thackeray
BJP vs Prahar : 'नौटंकी' कोण करीत आहे? बावनकुळे-बच्चू कडू यांच्यात जुंपली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com