Uddhav Thackeray reaction : काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'त्यांचा पक्ष...'

Congress goes solo decision News : काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयानंतर रविवारी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे.
Uddhav-Thackeray
Uddhav-ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असतानाच काँग्रेसने येत्या काळात महाविकास आघाडीची साथ सोडत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यातच राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याने महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयानंतर रविवारी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे. त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. माझा पक्ष स्वतंत्र आहे, असे स्पष्ट करीत एकाच वाक्यात विषय संपवला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्ताधारी महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. काँग्रेस आणि शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांवरही त्यांनी रोखठोक उत्तर दिले आहे. “उंबरठा हा शब्द चुकीचा आहे. त्यांचा पक्ष त्यांचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे आणि आमचा पक्ष आमचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी जाहीर केले होते. मुंबईत महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबतही जाणार नसल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Uddhav-Thackeray
BJP Politics: सावरकरांच्या जन्मभूमीत भाजपला सत्ता तर दूर, निवडणुकीत कोंडी होण्याची शक्यताच अधिक, काय आहे कारण?

भाजप (BJP) प्रादेशिक पक्ष संपवायला निघाले आहेत. भाजपला राष्ट्रगीत शिकवलं पाहिजे. त्यात पंजाब, सिंध, महाराष्ट्र आहे. या प्रादेशिक अस्मिता मारायला भाजप निघाला आहे. अनेकांत एकता आहे. ती एकता मारण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Uddhav-Thackeray
Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा उद्रेक; जुन्नरच्या नगराध्यक्षपद उमेदवारीचा वाद ‘मातोश्री’वर, संपर्कप्रमुखांनी बोलावली बैठक

मुंबई काँग्रेसचं मालाडमध्ये एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्यात मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधू एकत्र येणार हे निश्चित झाल्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने एकत्र लढण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेना-मनसेची होणारी संभाव्य युती लक्षात घेता हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर होणारी फरफट रोखण्यासाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याचे म्हटले जात आहे.

Uddhav-Thackeray
NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षाकडे इच्छुकांच्या रांगा, पहिल्याच दिवशी अर्ज संपले, 10 हजार घेऊन...

दुसरीकडे मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणं हा काँग्रेसचा निर्णय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील म्हणाले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा अद्याप चर्चा झाली नाही. उद्धव ठाकरे आणि मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते चर्चा करतील. काँग्रेससोबत संपर्क साधून योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Uddhav-Thackeray
Congress Politics : महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठी घडामोड, पुणे शहराला मिळणार नवीन शहराध्यक्ष?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com