Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी कॉल उचलला असता, तर दोन पक्ष फुटले नसते; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Shiv Sena Split News : गेल्या तीन महिन्यात महायुतीमधील छोटे-मोठे रुसवे फुगवे सुरुच असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे लपून राहिलेली नाही. एकीकडे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढत चालले आहे. तर दुसरीकडे शिवसेना उबाठा आणि भाजपची जवळीकता वाढत आहे.
devendra fadnavis, uddhav thackeray, Sharad Pawar
devendra fadnavis, uddhav thackeray, Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामध्ये महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सत्तास्थापन होईपर्यंत महायुतीमध्ये अनेक घडामोडी घडल्या. गेल्या तीन महिन्यात महायुतीमधील छोटे-मोठे रुसवे फुगवे सुरुच असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे लपून राहिलेली नाही. एकीकडे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढत चालले आहे. तर दुसरीकडे शिवसेना उबाठा आणि भाजपची जवळीकता वाढत आहे. त्यातच एका मुलाखतीप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा युती करणार का, यावर मोजक्या शब्दांत सूचक उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीप्रसंगी राज्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळ असा होता की, विरोधकांना शत्रू समजले जात होते. पण मी पुन्हा मुख्यमंत्री झालो, तेव्हाच एक गोष्ट स्पष्ट केली होती. मी याठिकाणी बदल घडवण्यासाठी आलो आहे, बदला घेण्यासाठी आलेलो नाही. मला संवाद कायम ठेवायचा आहे. माझे लक्ष विकासावर आहे. विरोधकांसोबत माझे चांगले संबंध आहेत. आम्ही आजही एकमेकांशी फोनवर बोलतो, असे या मुलाखतीवेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.

devendra fadnavis, uddhav thackeray, Sharad Pawar
Sharad Pawar party protest: शरद पवारांच्या पक्षाचे मेट्रोच्या रुळावर उतरत आंदोलन अन् नागरिक संतापले; आंदोलनकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी

'विरोधी पक्षाशी माझे संबंध चांगलेच राहिले होते. मधल्या काळात आमच्यात थोडेसे मतभेद होते. त्यामध्ये मलाही टार्गेट करण्यात आले होते. मात्र, आता आमच्यातील संबंध न बोलण्याइतपत खराब नाहीत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी योग्य वेळी माझा फोन घेतला असता, कॉल उचलला असता, तर दोन पक्षांमध्ये फूट पडलीच नसती, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे यांना टोला लगावला.

devendra fadnavis, uddhav thackeray, Sharad Pawar
Sharad Pawar : पवारांच्या एका फोनने एस. एम. जोशींचं मुख्यमंत्रीपद हुकलं...

'उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी माझा कॉल घेतला असता, तर आताची परिस्थितीच वेगळी असती. पण आता आम्ही एकमेकांचे फोन घेतो, असे सांगत फडणवीसांनी ठाकरेंसोबत आता त्यांचे संबंध सुधारले असल्याचे सांगताना सूचक संकेत दिले आहेत.

devendra fadnavis, uddhav thackeray, Sharad Pawar
Eknath Shinde: सरनाईकांचं अध्यक्षपद हे झालं एक कारण, पण शिंदेंची नाराजी दूर करणं इतकं सोपं थोडंय; फडणवीसांचीही कसोटी लागणार?

विरोधी पक्षात असलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबतदेखील माझे संबंध कधीच वाईट नव्हते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पाच वर्षांमधील अनुभवातून मी एक गोष्ट नक्की शिकलो आहे. एखाद्या गोष्टीला नाही म्हटले म्हणजे ती गोष्ट नाहीच होणार असे नाही, अशी पुस्तीही फडणवीसांनी यावेळी जोडली. मात्र, भविष्य काळात उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यासोबत हातमिळवणीची शक्यता फेटाळून लावत त्यांनी जे चालले आहे ते उत्तम असल्याचे स्पष्ट केले.

devendra fadnavis, uddhav thackeray, Sharad Pawar
Eknath Shinde : सभागृह गाजवणाऱ्या ठाकरेंच्या 'या' फायरब्रँड नेत्याला एकनाथ शिंदेंनी दिली खुली ऑफर

राज्यातील महायुती सरकारमधील तीन पक्ष एकत्रित आहेत. आमच्यात कसलेच मतभेद नाहीत. केवळ काही प्रसार माध्यमांकडून नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. आम्ही तिघेजण एकत्रित आहोत, आमच्यात कसलेच मतभेद नाहीत. भविष्यात आम्ही एकत्रितच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ प्रसार माध्यमांकडून मी एकनाथ शिंदेंच्या कामांना स्थगिती देत असल्याचा आरोप केला जात आहे. मी कामांना स्थगिती देण्यास उद्धव ठाकरे नाही, असे मी विधानसभेत सांगितले आहे. त्यामुळे आमचे मस्त चालले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

devendra fadnavis, uddhav thackeray, Sharad Pawar
Shivsena UBT : मोदींच्या राजीनाम्याने ठाकरे गटात रस्सीखेच; चिपळूण शहरात शिवसेनेला वालीच मिळेणा?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. ते नाराज नाहीत, आम्ही तीन पक्ष मिळून सर्व निर्णय एकत्रित घेत असतो, आमच्यात कसलेच मतभेद नाहीत. आम्ही तीन पक्ष मिळून सर्वजण एकत्रित आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

devendra fadnavis, uddhav thackeray, Sharad Pawar
Suresh Dhas : धनंजय मुंडे यांच्याविरोधातील ‘हा’ आरोप सुरेश धसांनी थांबविला; कारणही आले पुढे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com