Sharad Pawar party protest: शरद पवारांच्या पक्षाचे मेट्रोच्या रुळावर उतरत आंदोलन अन् नागरिक संतापले; आंदोलनकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी

Politcal News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या रुळावर उतरत आंदोलन केले. अनपेक्षितरित्या झालेल्या या आंदोलनामुळे मेट्रो वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली नागरिकांचे हाल झाले
Pune metro
Pune metro Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या रुळावर उतरत आंदोलन केले. अनपेक्षितरित्या झालेल्या या आंदोलनामुळे मेट्रो वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे नागरिकांनी याबाबत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांचे धरपकड करण्यात आली. तर आंदोलनकर्त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली.

शिवाजीनगर कोर्ट येथून पुढे वनाजच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोच्या फेऱ्या अचानक रद्द करण्यात आल्या. मेट्रोने प्रवास करणारा नागरिकांना शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर उतरवण्यात आले. त्यानंतर रामवाडीहून आलेल्या नागरिकांना शिवाजीनगर कोर्ट येथे उतरून रिक्षा आणि कॅबने पुढील प्रवास करावा लागला. हीच परिस्थिती छत्रपती संभाजी उद्यान स्टेशनवरील नागरिकांची देखील झाली. त्यांना तेथून पुढे रामवाडीच्या दिशेने मेट्रोने जाता आले नाही.

Pune metro
Suresh Dhas : 'काय होतास तू अन् काय झालास तू' ; सुरेश धस नेमके कोणाला उद्देशून म्हणाले ?

मेट्रोकडून देखील याबाबत कोणतीही माहिती प्रवाशांना देण्यात येत नव्हती. यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी पोचण्यासाठी घाईत असलेल्या प्रवाशांच्या अतोनात हाल झाले. तास, दीड तास हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप या नागरिकांनी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

Pune metro
Suresh Dhas : धनंजय मुंडे यांच्याविरोधातील ‘हा’ आरोप सुरेश धसांनी थांबविला; कारणही आले पुढे...

दरम्यान, राष्ट्रवादीच्या (NCP) काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तरुणांना रोजगार मिळत नसल्यासह अन्य काही मागण्यासाठी महापालिका मेट्रोस्थानकाच्या रुळावर उतरत आंदोलन केले. यावेळी मेट्रोसह इतर ठिकाणी स्थानिक तरुणांना संधी दिली जात नसल्याचा आरोप करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.

Pune metro
Eknath Shinde: सरनाईकांचं अध्यक्षपद हे झालं एक कारण, पण शिंदेंची नाराजी दूर करणं इतकं सोपं थोडंय; फडणवीसांचीही कसोटी लागणार?

आंदोलकाना मेट्रो ट्रॅकपासून बाहेर घेण्यासाठी पोलिसांकडून देखील प्रयत्न करण्यात आला तसेच फायर ब्रिगेडला देखील, पाचारण करण्यात आले. धोकादायक पद्धतीने हे आंदोलन करण्यात येत असल्याने फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी देखील सुरक्षेची काळजी घेतली होती. अखेर पोलिसांनी समजूत काढत या आंदोलनकर्त्यांना बाजूला घेत ताब्यात घेतले असल्याचे समोर आले आहे.

Pune metro
Eknath Shinde : सभागृह गाजवणाऱ्या ठाकरेंच्या 'या' फायरब्रँड नेत्याला एकनाथ शिंदेंनी दिली खुली ऑफर

काय होत्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

सुशिक्षित पदवीधर बेरोजगारांसाठी रोजगार मिळालाच पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, झाशीची राणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा इतिहास सर्वं शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे. शाळा व शिक्षण याचा चाललेला व्यावहारिक बाजार थांबला पाहिजे. प्रत्येक तरूण तरूणीला स्वरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. महिलांवरील सर्व प्रकारचे लैंगिक अत्याचार थांबले पाहिजे. शाळा व महाविद्यालयामध्ये शिक्षण मोफत झालेच पाहिजे. शासकिय रूग्णालयातील भष्ट्राचार पूर्णपणे बंद झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात शासकिय रूग्णालयात औषाधासहित मोफत सेवा दिली गेली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका व इतर शासकिय कार्यालय येथे सर्व सामान्य नागरिकांना त्वरित सेवा व सन्मानपूर्वक वागणूक दिली गेली पाहिजे. शासकिय निधीचा वापर सामान्य जनतेच्या हितासाठीच झाला पाहिजे. राजकारणातील घराणेशाही बंद झाली पाहिजे, अशा स्वरूपाच्या मागण्या आंदोलकाकडून करण्यात आल्या आहेत.

Pune metro
Local Government Elections : लावा ताकद! पुढच्या 90 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

आंदोलन करणाऱ्या नरेंद्र पावटेकरांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी

याबाबत माहिती देताना प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, 'नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत. त्यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कुठल्याच आंदोलनात व कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये रविवारी त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे त्याचबरोबर एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे या गोष्टी केल्या, निश्चितच या सर्व गोष्टी निषेधार्य आहेत.

आजचे त्यांचे आंदोलन ही वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, आणि एकूणच पुणेकरांची आडवणूक करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com