Uddhav Thackeray Setback : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराने पक्ष सोडला; आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Santosh Tarfe join Eknath Shinde Shivsena : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदाराने आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाला जय महाराष्ट्र केला असून ते आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Uddhav Thackeray Santosh Tarfe
Uddhav Thackeray Santosh Tarfesarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 'कळमनुरी'चे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेते प्रवेश आज प्रवेश करणार आहेत.

टारफे यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि अनेक पदाधिकारी देखील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. हिंगोलीमधून या पक्षप्रवेश सोहळ्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे मुंबईकडे रवाना झाला आहेत.

संतोष टारफे यांच्या या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जिल्ह्यात पुन्हा एकदा ताकद वाढणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा पक्षाला होणार असल्याचे सांगितले जात आहे.

टारफे यांच्यासह एस पी राठोड,रमेश जाधव, सखाराम उबाळे , दुर्गे पाटील यांच्या सह शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Uddhav Thackeray Santosh Tarfe
Dasara Melava: '2019 मध्ये महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, हीच खरी व्होटचोरी...'; एकनाथ शिंदेंचा जिव्हारी लागणारा बाण

ज्यांच्याकडून पराभव त्यांच्यात पक्षात प्रवेश

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांनी टरफे यांचा विधानसभेला पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी ज्या सातवांकडून पराभव पत्काराला त्यांच्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता दोन वर्षापू्र्वी त्यांना संतोष बांगर यांनी टरफे यांचा पराभव केला होता. बांगर हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. आता त्याच पक्षात टरफे प्रवेश करत आहेत.

Uddhav Thackeray Santosh Tarfe
Nashik Kumbh Mela News: कुंभमेळ्यात साधू आखाड्यांना शिवसेना देणार भोजन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवरून वाद

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.