Mumbai News : राज्यातील महायुतीमधील मतभेद लपून राहिलेले नाहीत. चार दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भाजप-शिवसेनेतील वाद समोर आला. विशेषतः डोंबविली येथील नगरसेवक पळवण्यावरून महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चांगलाच कलगीतुरा रंगला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीवर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समजूत काढत यापुढील काळात युती धर्माचे पालन करावे, असे ठरले होते.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतरही शिंदे यांची नाराजी दूर झाल्याचे दिसत नाही. डहाणू येथील कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी भाजपवर पहिल्यांदा टीका केली आहे. त्यामुळे शिंदे यांची नाराजी अद्याप दूर झाली नसल्याची चर्चा रंगली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाविषयी विस्तृतपणे चर्चा केली होती. मात्र, त्यानंतरही एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
दिल्लीहून परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी डहाणू येथील कार्यक्रमप्रसंगी बोलताना पहिल्यांदाच भाजपचे (BJP) नाव न घेता टीका केली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, 'डहाणूमध्ये आपण सर्वजण एकत्र आलेले आहात. एकाधिकारशाहीच्या विरोधात एकत्र आलेले आहात. आपण अहंकाराच्या विरोधात एकत्र आलो आहोत. या अंहकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाली, अशी टीका त्यांनी यावेळी भाजपचे नाव न घेता केली.
येत्या दोन तारखेला तेच काम करायचे आहे. लाडक्या बहिणांना मी एवढेच सांगतो की तुम्ही चमत्कार घडवू शकता. तुमचा चमत्कार विधानसभा निवडणुकीत आम्ही पाहिला आहे. डहाणूत तर हे काम सोपे आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ठरवले तर कोणीही आला तरी रोखू शकत नाही. आपला विजय हा पक्का असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
भाजप-सेना कार्यकर्त्यांचा राडा
दरम्यान, एकीकडे राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विरुद्ध उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा वाद आणि नाराजीनाट्य सुरू असतानाच ठाण्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाने शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची तक्रार नौपाडा पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.