Adway Hiray`s Allegations on Dada Bhuse : पालकमंत्री दादा भुसे गिरणा मोसम शुगर कंपनीच्या नावाने जमा केलेल्या पैशाचा हिशेब का देत नाहीत. त्यात किती भ्रष्टाचार झाला? याबाबत २०१७ पासून दाखल याचिकेतील प्रश्नांना ते का घाबरतात, असा सवाल शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी केला आहे. (Adway Hire made a seious allegation on Dada Bhuse)
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी गिरणा साखर कारखाना (Malegaon) वाचविण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसा गोळा केला. गेल्या तेरा वर्षांत त्याबाबत पहिल्यांदा वार्षिक सभा घेतली, अशी टीका शिवसेनेचे (Shivsena) अद्वय हिरे (Adway Hire) यांनी केली.
हिरे म्हणाले, यासंदर्भात मी न्यायालयासमोर सबळ पुरावे दिले आहेत, त्याचा खुलासा पालकमंत्र्यांनी करावा, हेच नाही या कंपनीव्यतिरिक्त त्यांनी गिरणा बचाव कृती समितीच्या नावाने सर्वसामान्य जनतेकडून पावत्या फाडल्या आहेत, त्याचा तर कोठेच हिशेब नाही.
गेल्या तेरा वर्षांत पहिल्यांदा पहिली जनरल मीटिंग घेतली, याचे उत्तर द्यावे तसेच निवडणूक अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात स्वतःसह पत्नी व दोन्ही मुलांच्या नावाने या कपनीचे शेअर्स असल्याचे दाखवले आहेत, तर त्यांच्याव्यतिरिक्त त्यांनी दाखवलेल्या ४७ जणांच्या यादीत पत्नी व मुलांची नावं का वगळली?, असा प्रश्न हिरे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, मालेगावच्या या थापड्याने निवडणूक आयोगास खोटी माहिती दिली की, वेबसाइटवरच्या यादीत खोटी माहिती दिली, की काॅर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला दिलेली माहिती खरी याबाबत खुलासा या थापाड्याने करावा, अशी मागणी करून कंपनी कायद्यानुसार सर्वसाधारण सभेची नोटीस १५ दिवस आधी जिल्हा वृत्तपत्रात द्यावी लागते. त्यांनी सभेच्या दोन दिवस आधी स्थानिक वृत्तपत्रात माहिती का दिली. याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागणारच आहोत.
शिवसेनेतर्फे येथील मसगा महाविद्यालय सभागृहात झालेल्या ‘होऊ द्या चर्चा - विचारा प्रश्न’ या उपक्रमात ते बोलत होते. संपर्कप्रमुख जयंत दिंडे, राजाराम जाधव, दशरथ निकम, अरुणा सोनजकर, काशीनाथ पवार, संजय निकम, प्रेम माळी व्यासपीठावर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.