Maliwada Gate demolition Ahilyanagar : 'वेस पाडूच!', आमदार जगतापांच्या शिलेदाराचा संताप; सभागृहात तणावपूर्ण वातावरण

Corporators from NCP and BJP, including Sampat Barskar, push for demolition of the historic Maliwada gate listed under the Archaeological Department during municipal budget discussions : अहिल्यानगर शहरातील माळीवाडा वेस पाडण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत, राष्ट्रवादी-भाजप नगरसेवक प्रशासनावर चांगलेच आक्रमक झाले होते.
Sampat Barskar
Sampat BarskarSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Maliwada Gate demolition : अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक 400 वर्षांपूर्वीची माळीवाडा वेस पाडण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे शिलेदार शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक संपत बारस्कर आज महापालिका सभागृहात चांगलेच आक्रमक झाले होते. माळीवाडा वेस तात्काळ पाडावी, त्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. महापालिकेने कारवाई केली नाही तर, आम्हीच ती वेस पाडू, असा इशारा देत प्रशासनाला थेट आव्हान दिले.

संपत बारस्कर यांच्या या भूमिकेवर एकनाथ शिंदे शिवसेनेचे नगरसेवक गटनेता दत्तात्रय कावरे आणि माजी महापौर संपत बारस्कर चांगलेच आक्रमक झाले. यानंतर मात्र सत्ताधारी राष्ट्रवादी-भाजप नगरसेवक आणि विरोधक नगरसेवकांमध्ये, म्हणजेच एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी माळीवाडा वेस पाडण्याची मागणी 57 नगरसेवकांनी काल शुक्रवारीच्या सभेत केली होती. तसं अजित पवार राष्ट्रवादीच्या (NCP) महापौर ज्योती गाडे आणि भाजपचे उपमहापौर धनंजय जाधव यांना मागणीचं निवेदन दिलं होतं.

अर्थसंकल्पीय सभेच्या कामकाज आज उरकत असताना, सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादीने माळीवाडा वेस पाडण्यावरून आक्रमक भूमिका घेतली. नगरसेवक संपत बारस्कर यांनी ही माळीवाडा वेस तात्काळ पाडावी, त्याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. महापालिकेने (Municipal) कारवाई केली नाही तर आम्हीच ती वेस पाडू, असा इशारा देत प्रशासनाला थेट आव्हान दिले.

Sampat Barskar
Shripad Chindam : हकालपट्टी की राजकारण? छिंदमचा आरोप; “माझ्या जीवाला धोका, आमदार जबाबदार!”

संपत बारस्कर यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेला सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजपने समर्थन दर्शवले. माळीवाडा वेस पाडण्याच्या समर्थकात आवाज वाढत असतानाच, एकनाथ शिंदे शिवसेनेचे नगरसेवक कावरे आणि कदम यांनी विरोध दर्शवला.

Sampat Barskar
Sunil Tatkare And Rupali Chakankar : “तटकरेंना आरोपी करा!” राष्ट्रवादी आक्रमक, जयंत पाटलांचा फोटो पुढे करत पलटवार, ‘स्क्रिप्ट’वरून खळबळ

या दुहेरी कोंडीवर आता प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागले आहे. माळीवाडा वेस पाडून तिथं फुले दाम्पत्याचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी फुले दाम्पत्य स्मारक समितीने पूर्वी केली होती. पुतळा उभारताना परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची देखील मागणी आहे. याचा देखील संदर्भ आजच्या सभेत पुन्हा देण्यात आला.

मराठा, पेशवेकाळातील ऐतिहासिक वास्तू

दरम्यान, माळीवाडा वेस 400 वर्षांपूर्वीचा आहे. तिला ऐतिहासिक संदर्भ आहेत. माळीवाडा वेस ही निजामशाही काळातील किंवा त्यानंतरच्या मराठा/पेशवे काळातील ऐतिहासिक वास्तू मानली जाते. ही वेस प्राचीन अहमदनगर शहराच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या तटबंदीचा एक भाग होती.

स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना

वेशीच्या बांधकामात वापरलेला दगड आणि तिची रचना तत्कालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. यामुळे या वेशीला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा प्राप्त आहे. ही वेस शहराच्या जुन्या भागातील मुख्य प्रवेशद्वारांपैकी एक असून, ती शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देते.

खासदार लंकेंचं पत्र

पुरातत्व विभागाने (छत्रपती संभाजीनगर) ही वास्तू ऐतिहासिक असल्याचे मान्य करत ती न पाडता तिचे जतन करण्याचे निर्देश दिले आहेत. ही वास्तू पाडू नये, अशी स्थानिकांची देखील मागणी आहे. खासदार नीलेश लंके यांनी देखील महापालिका प्रशासन आणि पुरातत्व विभागाला यासंदर्भात पत्र देत, वेशीचं जतन करण्याची मागणी केली आहे.

आमदार जगतापांची पडद्याआड भूमिका

यात राजकीय विरोधक परस्परविरोधी मागणी करत असल्याने, वेस पाडण्यावरून राजकारण रंगले आहे. यात शहरातील आमदार संग्राम जगताप समोर येत, भूमिका मांडत नसले, तरी त्यांचे नगरसेवक सभागृहात वेस पाडण्यासाठी आक्रमक झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com